Thar-Fortuner Viral Video : या कलेक्टरने थार, फॉर्च्यूनरवाले बोलवले, करायला सांगितलं असं काही की होतेय देशभरात चर्चा!
Thar-Fortuner Viral Video News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फॉर्च्युनर आणि थार या गाड्यांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. त्यानंतर एका कलेक्टर येतात आणि...

सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होतात. त्यावरुन जोरदार चर्चा रंगते आणि विषय एकदम मोठा होतो. यामध्ये काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही गंभीरही असतात, जे नेटकऱ्यांच्या मनाचा ठाव घेतात. देशात असं चित्र अनेकदा आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्याने एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, हा व्हिडिओ दमनमधला आहे.
दमनमध्ये प्रशासन आणि आरटीओ विभागाच्या ‘रफ्तार नहीं, संस्कार’ या रस्ते सुरक्षा अभियानाची सध्या चर्चा होत आहे. या अभियानात 100 हून अधिक थार आणि फॉर्च्युनर गाड्या एकाच रांगेत उभ्या करण्यात आल्या. त्यानंतर दमनच्या कलेक्टरांनी वाहन मालकांना गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याची, वाहतूक नियम पाळण्याची आणि रस्त्यावर हीरोगिरी किंवा भाईगिरी न करण्याची शपथ दिली. या संकल्प यात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, कलेक्टर साहेबांनी दिलेल्या या शपथेमुळे खरंच काही बदल होईल का, यावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
Daman Collector made Thar and Fortuner owners take an oath to drive safely on the roads. pic.twitter.com/zCpJy9BqOr
— DesiEsco🇮🇳 (@DesiEsco7) September 10, 2026
दमणमधील या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या जोरदार आणि विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिलं की, “राजकारणी, आयपीएस, आयएएस सगळेच शपथ घ्यायला लागलेत. लग्नातसुद्धा लोक शपथा घेतात, पण शेवटी विषय पैशांवर येतो, काही वाहतूक अधिकारी पैसे खातात. याशिवाय अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्याही काही थांबत नाही. माझ्या मते एकच न्याय असायला हवा, जर कायदा मोडला तर कायद्यानुसारच शिक्षा झाली पाहिजे. ज्या कायद्याचं उल्लंघन झालंय, त्यानुसारच थेट कारवाई व्हावी. विषय एकदम सोपा आहे. मध्येच.”
तर दुसऱ्या एकाने लिहिलं की, “माझ्याकडे पण थार आहे. मी खूप जबाबदारीने गाडी चालवतो. लोक देशाची सेवा करायची शपथ घेतात, तरीसुद्धा लाच घेताना पकडले जातात. नियम फक्त कागदावर न ठेवता थेट प्रत्यक्षात लागू करायची गरज आहे आणि याची सुरुवात सरकारी संस्थांपासूनच झाली पाहिजे.”
तर आणखी एका तिसऱ्याने सांगितलं प्रतिक्रियेमध्ये लिहिलं की “नुसत्या शपथा घेऊन काहीही होणार नाही, त्यासोबत कायदेसुद्धा कडक करायला हवेत. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय खूप चांगला आहे.”