दिल्लीच्या हर्ष विहार येथे इमारतीचे बांधकाम कोसळले,ढीगाऱ्यात काही लोक अडकले असल्याची भीती

उत्तर-पूर्व दिल्लीतील हर्ष विहार ठाणे क्षेत्रातील मिलन गार्डन येथे रविवारी सायंकाळी एका एक मजली घराचे बांधकाम कोसळल्याची घटना घडली. बांधकाम सुरु असलेल्या या इमारतीच्या ढीगाऱ्यात काही लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिल्लीच्या हर्ष विहार येथे इमारतीचे बांधकाम कोसळले,ढीगाऱ्यात काही लोक अडकले असल्याची भीती
DELHI NEWS
| Updated on: Oct 25, 2026 | 10:35 PM

बांधकाम सुरु असलेल्या एका एक मजली इमारतीचे बांधकाम रविवारी अचानक कोसळल्याची घटना उत्तर-पूर्व दिल्लीतील हर्ष विहार – मिलन गार्डन परिसरात घडल्याने खळबळ उडाली. दिल्लीच्या फायरब्रिगेटला सायंकाळी ६.४६ वाजता या अपघाताचा कॉल आला, त्यानंतर अग्निशमन दलाची पाच वाहने घटना स्थळी पोहचली. अपघाताच्या आवाजाने आजूबाजूच्या घरातील लोक बाहेर पडले आणि त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या इमारतीच्या ढीगाऱ्यात अनेक लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच हर्ष विहार पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि संबधित टीम घटना स्थळी पोहचल्या. या ठिकाणी एनडीआरएफ, दिल्ली फायर सर्व्हीस आणि सिव्हील डिफेन्सच्या पथकांनी येथे बचाव कार्य सुरु केले. डीडीएमएच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला देखील घटनास्थळी पाचारण केले. एनडीआरएफ आपले डॉग स्क्वॉड आणि सामुग्रीसह घटनास्थळी पोहचले. बचाव दलाने ढीगारा हटवण्यास सुरुवात केली. स्थानिक लोकांनी देखील येथे मदतकार्य सुरु केले.

Loading...

डीसीपी संदीप लांबा म्हणाले..

दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांच्या मते ही एक जुनी एक मजली इमारत होती. ज्याच्यावर अतिरिक्त मजल्याचे काम सुरु करण्यात येत होते.इमारतीच्या आजूबाजूला चारी बाजूंनी इतर इमारती घेरलेल्या असल्याने नेमका कोणता भाग कोसळला आहे हे कळणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले.अजूनपर्यंत कोणालाही ढीगाऱ्यातून बाहेर काढता आलेले नाही. काही लोक ढीगाऱ्यात अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एका स्थानिक व्यक्तीचा दावा

एका स्थानिकाने सांगितले की, घराला नवीन काँक्रीटचे छत बसवले जात होते. खालचे जुने छत कमकुवत होते आणि त्यावर नवीन लिंटेल बसवला जात होता. याच दरम्यान, खालचे छत कोसळले, ज्यामुळे त्यावर बसवला जाणारा नवीन लिंटेलही खाली कोसळला. कुटुंबातील सदस्यांचा हवाला देत, त्या स्थानिक व्यक्तीने सांगितले की त्याचे दोन कुटुंबीय ढिगाऱ्याखाली अडकले असावेत. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. सध्या तरी येथे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us