PUC नसेल तर 1 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेल मिळणार नाही! तुमच्या गाडीचं सर्टिफिकेट ऑनलाइन कसं तपासाल?

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी 1 नोव्हेंबरपासून दिल्लीमध्ये कडक नियम लागू होणार आहेत. वैध PUC प्रमाणपत्र नसल्यास इंधन मिळण्यात अडचण येऊ शकते.

PUC नसेल तर 1 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेल मिळणार नाही! तुमच्या गाडीचं सर्टिफिकेट ऑनलाइन कसं तपासाल?
no PUC no fuel rules from November 1
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 23, 2026 | 4:30 PM

दिल्लीमध्ये प्रदुषण प्रचंड वाढलं आहे. त्याच्यावर नियंत्रण मिळवणं हे सध्या सरकारपुढील मोठं आव्हान आहे. त्यासाठी विविध उपाययोजना काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्याचपार्श्वभूमिवर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून आता दिल्लीमध्ये नो पीयूसी नो फ्लूएल म्हणजेच PUC नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, असं धोरण राबवलं जाणार आहे. त्यामुळे जर आता तुमच्या वाहनाचंही प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र हे कालबाह्य झालं असेल किंवा वैध नसेल तर तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल मिळू शकणार नाही. पेट्रोप पंपचालक तुम्हाला स्पष्टपणे नकार देतील. एवढच नाही तर, जर तुम्ही वैध पीयूसीशिवाय वाहन चालवत असाल तर त्यासाठी तुम्हाला मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो.

१ नोव्हेंबरपासून दिल्लीमध्ये नॉन बीएस ६ वाहनांच्या प्रवेशावरही निर्बंध लागू केले जात आहेत, पेट्रोल पंपांवरील वाहनांच्या रांगा आणि होणारा त्रास टाळण्यासाठी सर्व वाहन मालकांनी घरातून निघतानाच त्यांच्या वाहनांची पीयूसी तापासावी असा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी सरकारने ऑनलाइन पोर्टलची मदत घेण्याचे आवाहन केले गेले आहे. परिवहन पोर्टल आणि एमपरिवहन या अॅपद्वारे हे काही मिनिटांत तपासता येते.

Loading...

पीयूसी प्रमाणपत्रचा कालावधी किती असतो?

दरम्यान, नवीन वाहन घेतल्यानंतर नोंदणीच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत प्रदुषण चाचणीची आवश्यकता नसते. पण पहिलं वर्ष संपल्यानंतर मात्र दर सहा महिन्याला किंवा काही केसेसमध्ये वार्षिकच्या हिशोबानेही तुम्ही वाहनाची चाचणी करणं गरजेचं असतं. सहा महिने हा तुलनेने कमी असल्याने अनेकदा लोक हे करायला विसरुन जातात. किंवा वर्षभरानेच करायची ठरवतात. त्यामुळे तुम्ही मुदत संपल्याची लक्षात येण्यासाठी एक आठवडा आधी रिमाइंडर सेट करु शकता.

जर समजा तुम्हाला ऑनलाइन नोंद दिसत नसेल तर नंतर पुन्हा प्रयत्न करा. मूळ प्रमाणपत्र तुमच्या वाहनासोबत ठेवा. त्यावरील अगदी सेम नावे आणि क्रमांक न चुकता भरा. त्यामुळे तुम्हाला ऑनलाइन रेकॉर्ड १०० टक्के दिसेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us