प्रत्येक गाव आणि शहरात विकास पोहोचला; आम्ही.., पंतप्रधान मोदी यांनी मांडला गेल्या 12 वर्षांमधील प्रगतीचा लेखाजोखा

बुधवारी दिल्ली स्थित भारत मंडपममध्ये एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी गेल्या 12 वर्षांमध्ये देशात काय -काय प्रगती झाली याबद्दल माहिती दिली.

प्रत्येक गाव आणि शहरात विकास पोहोचला; आम्ही.., पंतप्रधान मोदी यांनी मांडला गेल्या 12 वर्षांमधील प्रगतीचा लेखाजोखा
Narendra Modi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 10, 2026 | 9:18 PM

बुधवारी दिल्ली स्थित भारत मंडपममध्ये एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. 2014 ला जो गरीब वर्ग होता, तो आता नवा मध्यम वर्ग बनला आहे, आम्ही या न्यू मीडिल क्लासला कधीही निराश करणार नाही, त्यांचा आम्ही विकास करू, माझ्यासाठी जनता जनार्धनचं देवाचं स्वरुप आहे, हे मी माझं भाग्य मानतो असं यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज जगातील अनेक मोठ्या देशांची अर्थव्यवस्था संघर्ष करत असल्याचं पहायला मिळत आहे, अशी स्थिती असताना देखील आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतानं आपला आर्थिक ग्रोथ रेट 7.7 टक्के ठेवण्यात यश मिळवलं आहे. त्याच्या मागच्या आर्थिक वर्षात देखील भारताचा आर्थिक ग्रोथ रेट 7.8 टक्के एवढा होता. हे यश एवढं सोप नाहीये. आज आपण जगातील सर्वात झपाट्याने वाढत असलेली अर्थव्यवस्था बनलो आहोत. आम्ही गेल्या 12 वर्षांपासून प्रत्येक शहर आणि गावांमध्ये विकास पोहोचवण्याचं काम केलं आहे, असं यावेळी मोदी यांनी म्हटलं.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने जनतेचा विश्वासघात केला, मात्र तरी देखील लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. मात्र त्यानंतर 2014 मध्ये एका नव्या आशेचा सूर्य उगवला, या बारा वर्षांच्या कार्यकाळाचं आणखी एक मोठं यश म्हणजे देश काँग्रेसच्या कारस्थांनाच्या सापळ्यातून मुक्त झाला. काँग्रेसच्या कार्यकाळात देशाच्या वाट्याला गरिबी, असहाय्यता आणि एक प्रकारच्या न्यूनगंड वाट्याला आला. त्यावेळी सर्वांना हेच वाटत होतं की आता भारताचा विकास कधीच जलद गतीने होऊ शकणार नाही. काँग्रेसने मोठ्या हुशारीने याला ‘हिंदू ग्रोथ रेट’ असं नाव दिलं. म्हणजे अपयश हे काँग्रेसचं होतं, मात्र त्यांनी या सर्वांसाठी देशाची मोठी लोकसंख्या असलेल्या हिंदूना जबाबदार धरलं, असा हल्लाबोल यावेळी मोदींनी केला आहे.

एनडीएचं सरकार आल्यानंतर देशाचं नशीब बदललं

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आलं तेव्हा आपल्याला वेगवान विकासाची झलक पहायला मिळाली. मात्र दुर्दैवाने पुन्हा एकदा 2004 मध्ये देशात काँग्रेसचं अस्थिर सरकार सत्तेत आलं. त्या काळात काँग्रेसने देशाचा विकास करण्याऐवजी देशाला हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारात अडकवलं. मात्र जेव्हा 2014 मध्ये देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आलं तेव्हा देशाचं नशीब बदललं. देशाचा अधिक वेगानं विकास झाला.

 

Follow Us