तुमच्याही घरात आहेत का या 3 गोष्टी? मग सापांना आमंत्रणच; पळत घरात येतील, आजच सावध व्हा
आपल्या घरात अशा काही वस्तू असतात, ज्यामुळे साप तुमच्या घराकडे आकर्षित होऊ शकतो. अशा वस्तू जर तुमच्या घरात असतील तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे, अन्यथा सापांपासून धोका निर्माण होऊ शकतो.

साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो, आजही अनेक भागांमध्ये सापांबद्दल प्रचंड गैरसमज आहेत. साप म्हटलं की तो विषारीच असणार असा सर्वसामान्यपणे आपला समज आहे. त्यामुळे आपण भीतीपोटी कुठेही साप दिसला की त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र यामध्ये फारसं तथ्य नाही, भारतामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच सापांच्या प्रजाती या विषारी आहेत, ज्यामध्ये फुरसे, मण्यार घोणस आणि नाग या चार प्रमुख सापांच्या प्रजातीचा समावेश होतो. त्यामुळे तुम्हाला कुठेही साप आढळून आला तर त्याला मारू नका, तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी सोडतील, तसेच घरात निघालेल्या सापांना पकडण्याचा देखील प्रयत्न करू नका, ते तुमच्या जीवावर बेतू शकतं.
दरम्यान अशा काही गोष्टी तुमच्या घरात किंवा अवतीभोवती असतात, ज्यामुळे साप तुमच्या घरात थेट घुसू शकतात. यामुळे काळजी घेणं गरजेचं असतं. जर तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये कबुतराचे घरटे असतील तर त्यामुळे साप तुमच्या बाल्कनीमध्ये येऊ शकतात. कारण त्यांना कबुतराची अंडी खाण्यास मिळतात. कधी-कधी तर साप कबुतरांची देखील शिकार करतात. जर तुमच्या घरात अर्धवट खालेल्या स्थितीमध्ये कबुतर असेल तर वेळीच सावध व्हा, कारण कदाचित अशा कबुतरावर सापाने हल्ला केल्याची शक्यता जास्त प्रमाणात असू शकते.
घरातील वातावरण जर तुमच्या घरातील वातावणर हे आर्द्रतायुक्त असेल तर अशा ठिकाणी देखील साप तुमच्या घराकडे आकर्षित होऊ शकतात. कारण सापांना नेहमी लपण्यासाठी आर्द्रतायुक्त वातावरण आणि अंधाऱ्या जागेची गरज असते, अशा ठिकाणी ते स्वत:ला सुरक्षित समजतात. त्यामुळे तुमच्या घरात असं वातावरण राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
याच प्रमाणेत तुमच्या घराच्या परिसरात वाढलेलं गवत असेल विशेष: पावसाच्या काळात तर साप अशा गवतामध्ये लपून बसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे घराच्या परिसरात कधीही गवत वाढू देऊ नका, घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा.