मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी बरी.. ट्विशा शर्माच्या कुटुंबावर संताप, थेट कोर्टातच..
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. ट्विशा शर्मा आणि समर्थ यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओही पुढे येत आहेत. आज या प्रकरणात कोर्टात सुनावणी होती.

देशभरात गाजत असलेल्या ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात कोर्टात नाराजी व्यक्त करण्यात आली. ट्विशा शर्मा हिच्या मृत्यूनंतर गंभीर आरोप केले जात आहेत. ट्विशा शर्मा हिचे कुटुंब गंभीर आरोप करत असतानाच तिच्या चारित्र्याबद्दल धक्कादायक विधाने सासरच्या मंडळींकडून करण्यात येत आहेत. लग्नाला 5 महिने पूर्ण होताच ट्विशा शर्मा हिचा संशयास्पद मृत्यू झाला, ज्यानंतर कुटुंबियांनी गंभीर आरोप केली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी भोपाळमधील ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणावर एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. 25 मे 2026 सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान महत्वाची टिप्पणी करण्यात आली. ही टीप्पणी फक्त एका ट्विशा शर्मा प्रकरणात नाही तर देशातील सर्व पालकांकरिता आहे. सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले की, मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी कधीही बरी..
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ट्विशा शर्मा हिच्या कुटुंबीयांवर नाराजी व्यक्त केली. याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, त्यांनी आपल्या मुलीच्या तक्रारीवर वेळीच लक्ष देणे आवश्यक होते. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचौली यांच्या खंडपीठासमोर मध्य प्रदेश सरकारकडून एसजी तुषार मेहता हजर झाले होते.
वकील सिद्धार्थ दवे आरोपीच्या कुटुंबातर्फे हजर झाले होते. लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणीदरम्यान असा युक्तिवाद केला की, ट्विशाची सासू आणि माजी जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंग यांनी टीव्ही चॅनलच्या मुलाखतीदरम्यान सुनेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच त्या तपासाला सहकार्य करत नाहीत.
सिद्धार्थ दवे यांनी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 अंतर्गत नोंदवलेला संपूर्ण जबाब आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे. ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे आणि आरोप केले जात आहेत. ट्विशा शर्मा आणि समर्थ यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यासोबतच ट्विशा शर्माने आपल्या कुटुंबियांना समर्थ याच्याबद्दल केलेल्या तक्रारीचेही स्क्रीनशॉर्ट व्हायरल होत आहेत.