दसऱ्याच्या सुट्ट्यांमध्ये या 5 सुंदर ठिकाणांना भेट द्या, सौंदर्य पाहून परत येण्याची होणार नाही इच्छा

ऑक्टोबरच्या लॉन्ग वीकेंडला फिरण्याचा फ्लॅन करताय? ही 5 सुंदर ठिकाणं ठरतील सर्वात बेस्ट. निसर्ग आणि तेथील सौंदर्य पाहून परत येण्याची होत नाही इच्छा.

दसऱ्याच्या सुट्ट्यांमध्ये या 5 सुंदर ठिकाणांना भेट द्या, सौंदर्य पाहून परत येण्याची होणार नाही इच्छा
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 19, 2026 | 5:09 PM

रोजच्या धावपळीपासून काही दिवस दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवायचा असेल तर ऑक्टोबरमध्ये फिरण्यासाठी चांगली संधी ठरू शकतो. दसऱ्याच्या सुट्ट्यांमध्ये 3 ते 4 दिवसांची छोटी ट्रिप आखून उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील सुंदर हिल स्टेशन्सना भेट देऊ शकता. हिरवीगार जंगलं, डोंगररांगा, नदीकिनारे आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध असलेली ही ठिकाणं कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासोबत फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

कनाताल, उत्तराखंड

Loading...

उत्तराखंडमधील कनाताल हे शांत वातावरण, हिरवीगार जंगलं आणि डोंगरांचे मनमोहक दृश्य यांसाठी ओळखले जाते. शहराच्या गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. निसर्गभ्रमंती, फोटोग्राफी आणि मित्र किंवा कुटुंबासोबत आरामदायी सुट्टीसाठी कनातालचा विचार करता येईल. हे ठिकाण दिल्लीपासून सुमारे 310 किमी आहे.

शानगढ, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील सैंज खोऱ्यात वसलेले शानगढ विस्तीर्ण हिरवीगार कुरणं आणि देवदाराच्या जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे आकर्षक ठिकाण आहे. जोडीदारासोबत शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठीही हा पर्याय चांगला आहे. हे ठिकाण दिल्लीपासून 515 किमी अंतरावर आहे.

बरोट व्हॅली, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील उहल नदीच्या परिसरात वसलेली बरोट व्हॅली आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. नदीकिनारा, डोंगर आणि शांत वातावरण यांचा आनंद येथे घेता येतो. मित्र किंवा कुटुंबासोबत गर्दीपासून दूर काही दिवस घालवण्यासाठी हे ठिकाण निवडता येईल. दिल्लीपासून 510 किमी अंतरावर हे ठिकाण आहे.

चकराता, उत्तराखंड

डोंगररांगा, घनदाट जंगलं आणि शांत वातावरणासाठी चकराता प्रसिद्ध आहे. कमी दिवसांच्या सुट्टीत निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर हा चांगला पर्याय ठरू शकतो. आसपासच्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देणे, फोटोग्राफी करणे आणि निवांत वेळ घालवणे अशा गोष्टींचा सहलीत समावेश करता येईल. हे देखील दिल्लीपासून 330 किमी अंतरावर आहे.

चैल, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील चैल हे देवदाराच्या जंगलांनी वेढलेले सुंदर डोंगराळ ठिकाण आहे. शांत वातावरण, निसर्गरम्य दृश्यं आणि आरामदायी सुट्टीसाठी हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. शिमल्याच्या तुलनेत वेगळा आणि निवांत अनुभव घ्यायचा असेल, तर चैलचा विचार करता येईल. दिल्लीपासून हे 350 किमी अंतरावर आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us