भर समुद्रात भारतीय बोटीवर भीषण हल्ला, हुती बंडखोरांच्या दाव्याने मोठी खळबळ

यमनच्या हुती बंडखोरांकडून मोठा दावा करण्यात आला आहे, तांबड्या समुद्रातून जाणाऱ्या भारतीय बोटीवर सौदी अरेबियाने हल्ला केला आहे. या बोटीमधून 14 लोक प्रवास करत होते, असा दावा यमनच्या हुती बंडखोरांकडून करण्यात आला आहे.

भर समुद्रात भारतीय बोटीवर भीषण हल्ला, हुती बंडखोरांच्या दाव्याने मोठी खळबळ
भारतीय बोटीवर हल्ला
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 22, 2026 | 6:36 PM

यमनच्या हुती बंडखोरांकडून मोठा दावा करण्यात आला आहे, तांबड्या समुद्रातून जाणाऱ्या भारतीय बोटीवर सौदी अरेबियाने हल्ला केला आहे. या बोटीमधून 14 लोक प्रवास करत होते, असा दावा यमनच्या हुती बंडखोरांकडून करण्यात आला आहे. मात्र या हल्ल्यामध्ये बोटीचं किती नुकसान झालं याची कोणतीही माहिती यमनच्या हुती बंडखोरांकडून देण्यात आलेली नाहीये. या हल्ल्याबाबत बोलताना यमनी सशस्त्र दलाचे प्रवक्ता ब्रिगेडियर जनरल याह्या सरी यांनी म्हटलं की सौदी अरेबियाने तांबड्या समुद्रात झुकार बेटाजवळ एका भारतीय बोटीवर हल्ला केला आहे. ज्यामध्ये 14 भारतीय प्रवासी प्रवास करत होते. आम्ही सध्या त्यांना वाचवण्याचं काम करत आहोत, या घटनेबाबत सविस्तर माहिती आम्ही लवकरच देऊ असं हुती बंडखोरांनी म्हटलं आहे. सौदी अरेबीयाकडून वारंवार अशा प्रकारचे गैरजबाबदार हल्ले होत आहेत. त्यामुळे तांबड्या समुद्रात आंतरराष्ट्रीय नेव्हिगेशन सिस्टमला धोका निर्माण झाला आहे.

सौदी अरेबीयाच्या हवाई हल्ल्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू

Loading...

एका अन्य घटनेमध्ये सौदी अरेबीयाने केलेल्या हल्ल्यामध्ये भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. दम्माम विमानतळावर हा हल्ला करण्यात आला आहे. तर या घटनेमध्ये अन्य दोन जण जखमी झाले आहेत. त्यापूर्वी सौदी अरेबियाकडून शायबा तेल क्षेत्राला टार्गेट करण्यात आलं होतं, ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये देखील एक भारतीय नागरिक जखमी झाला होता. सौदी अरेबीयाकडून यमनमधील हुती बंडखोरांवर हल्ले सुरूच आहेत. तेथील पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं जात आहे. यामध्ये हुती बंडखोरांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे हुती बंडखोरांकडून देखील सौदी अरेबियावर हल्ले सुरूच आहेत.

भारतीय दूतावासाकडून दुजोरा

भारतीय दूतावासाकडून सोशल मीडियावर एक पोस्ट जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, सौदी अरेबियाकडून बुधवारी रात्री उशिरा दम्माम विमान तळावर हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यामध्ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us