Abhinandan Varthaman : F-16 पाडून पाकिस्तानचा माज उतरवणारे शूर फायटर पायलट अभिनंदन वर्थमान यांनी का दिला एअरफोर्सच्या नोकरीचा राजीनामा?

Abhinandan Varthaman Resign IAF : भारताचे शूर वैमानिक अभिनंदन वर्थमान यांनी इंडियन एअर फोर्सच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. वर्थमान यांनी पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान पाडलं होतं.

Abhinandan Varthaman : F-16 पाडून पाकिस्तानचा माज उतरवणारे शूर फायटर पायलट अभिनंदन वर्थमान यांनी का दिला एअरफोर्सच्या नोकरीचा राजीनामा?
Abhinandan Varthaman
| Updated on: Sep 03, 2026 | 11:11 AM

ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्थमान यांनी इंडियन एअर फोर्सच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. बालाकोट एअर स्ट्राइक नंतर झालेल्या हवाई संघर्षात अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानचं F-16 फायटर विमान पाडलं होतं. 27 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीरच्या आकाशात भारत-पाकिस्तानच्या फायटर विमानांमध्ये डॉग फाईट झाली होती. त्यावेळी वर्थमान यांनी पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान पाडलं होतं. पण त्यावेळी त्यांचं मिग-21 बायसन विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलेलं. ते दोन दिवस पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. भारत सरकारच्या कणखर भूमिकेमुळे पाकिस्तानला कुठल्याही वाटाघाटीशिवाय त्यांना दोन दिवसात सोडावं लागलेलं. 27 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीरच्या आकाशात अभिनंदन वर्थमान यांनी आपल्या मिग-21 बायसन विमानाद्वारे जो पराक्रम दाखवला, त्यासाठी त्यांना वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं. एअर फोर्समधील नोकरीचा राजीनामा देऊन ते आता खासगी एअरलाइन्समध्ये नोकरी करणार आहेत. एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांना वर्थमान यांच्या राजीनाम्याची कल्पना आहे.

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफ जवानांच्या बसला धडकवण्यात आलेली. यात 40 सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला होता. भारत सरकारने 26 फेब्रुवारी 2019 ला पाकिस्तानातील बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावर एअर स्ट्राइक करुन बदला घेतला. यात शेकडो दहशतवादी ठार झाले होते. भारताने या कारवाईसाठी मिराज-2000 फायटर जेट्सचा वापर केलेला.

मिग-21 बायसन विमानाला मिसाइल धडकलं

भारताच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानची फायटर विमानं 27 फेब्रुवारी 2019 च्या सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये घुसलेली. त्यावेळी आकाशात दोन्ही देशांच्या फायटर विमानांमध्ये डॉग फाइट झाली. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी नवीन इतिहास रचला. अमेरिकेन बनावटीचं पाकिस्तानचं अत्याधुनिक F-16 फायटर जेट पाडलं. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या मिग-21 बायसन विमानाला मिसाइल धडकलं. त्यामुळे त्यांना विमानातून इजेक्ट करावं लागलं.

पॅराशूटच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरल्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी पकडलं. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असतानाही वर्थमान यांनी आपल्या शौर्याचा परिचय दिला होता. आता एअरफोर्समधील नोकरी सोडून ते खासगी विमान कंपनीसाठी काम करणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us