NEET परीक्षेसाठी सैन्याची मदत, CBSE 12th ची गुणदान प्रक्रियाही वादात, मोठ्या परीक्षा घेताना अपयश का ?
नीट पेपर फुटल्यानंतर आता पर्यंत या प्रकरणात सीबीआयने आता पर्यंत १३ जणांना अटक केली आहे. यानंतर CBSE ने 12th परीक्षेच्या उत्तर पत्रिका पहिल्यांदा डिजिटल पद्धतीने तपासताना अनेक त्रुटी झाल्या आहेत. देशातील या मोठ्या परीक्षा घेताना यंत्रणांना अपयश का येत आहे याचा घेतलेला हा धांडोळा...

पेपर फूटल्याने रद्द झालेली NEET-UG ची परीक्षा आता २१ जून रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे. यंदा पेपर पोहचवण्यापासून ते इतर सर्व प्रक्रीयेसाठी एअरफोर्स आणि आर्मीची मदत घेतली जाणार आहे. दुसरीकडे CBSE ने 12th परीक्षेच्या उत्तर पत्रिका यंदा पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने तपासल्या, मात्र यात विद्यार्थ्यांनी अनेक त्रूटी नजरेस आणल्या आहेत. मार्किंगचे काम प्रायव्हेट कंपनीला सोपवले होते.अखेर देशाच्या मोठ्या परीक्षा घेताना घोटाळे का होत आहेत ?सरकारची यंत्रणा कुठे फेल होत आहे ? यावर उपाय नेमके काय ? जाणून घेऊयात आजच्या एक्सप्लेनरमध्ये …. नीटची फेरपरीक्षा घेण्यात आता वायूदलाची मदत घेतली जाणार आहे. देशावर एका परीक्षेसाठी सैन्याची मदत घेण्याची वेळ का आली ? ३ मे २०२६ रोजी देशभरात २२.७९ लाख विद्यार्थी NEET-UG 2026 परीक्षेला बसले होते. ७ मे रोजी बातमी आली की हा पेपर सोशल मीडियावर आधीच फूटला होता. १२ मे रोजी NTA ने या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवला. आता पर्यंत या प्रकरणात...