GK : भारत फ्रान्सकडून कोण कोणत्या वस्तुंची खरेदी करतो? कोणत्या वस्तू विकतो?
सध्या फ्रान्समध्ये मोठं आंदोलन सुरू आहे. महागाई आणि मिळणाऱ्या सार्वजनिक सेवांच्या मुद्द्यांवरून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत.

सध्या फ्रान्समध्ये मोठं आंदोलन सुरू आहे. महागाई आणि मिळणाऱ्या सार्वजनिक सेवांच्या मुद्द्यांवरून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र आहे. भारत आणि फ्रान्समध्ये खूप जुने व्यापारी संबंध आहेत. युरोपीयन संघामध्ये समावेश असलेल्या देशांपैकी फ्रान्स हा भारताचा सर्वात जास्त विश्वासू भागीदार देश मानला जातो. फ्रान्सने अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारतीय हितसंबंधांचं समर्थन देखील केलेलं आहे. भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमधील व्यापार एकमेकांच्या प्रगतीसाठी पूरक असून, सध्याच्या काळात दोन्ही देश एकमेकांच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
भारत फ्रान्सकडून काय आयात करतो?
आर्थिक वर्ष 2023-24 च्या व्यावसायिक आकडेवारीनुसार भारताने फ्रान्सकडून जवळपास 7.9 अब्ज डॉलर रुपयांचं सामान खरेदी केलं आहे. यामध्ये विमानं, अंतराळ-संबंधित उपकरणे आणि त्यांचे सुटे भाग या वस्तूंची सर्वात जास्त आयात करण्यात आली आहे. यासोबतच बॉयरल, अवजड यंत्रसामग्री, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, अत्याधुनिक शस्त्रक्रिया उपकरणे, ऑप्टिकल उपकरणे ही उत्पादने देखील भारत दरवर्षी फ्रान्सकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करतो.
भारत फ्रान्सला काय निर्यात करतो?
आर्थिक वर्ष 2023-24 च्या व्यावसायिक आकडेवारीनुसार भारत देखील फ्रान्सला अनेक वस्तू निर्यात करतो, भारताने फ्रान्सला 7.14 अरब डॉलर रुपयांच्या वस्तू निर्यात केल्या, ज्यामध्ये मिनरल फ्यूल, मिनरल ऑईल, रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनं, विविध आजारांवरील औषधी, रेडीमेड गारमेंट्स, चामड्याची उत्पादनं, अत्याधुनिक स्मार्टफोन, सोन्या -चांदीचे दागिने, मोबाईलचे सुटे भाग या वस्तूंचा समावेश आहे, भारताच्या या वस्तूंना फ्रान्समध्ये मोठी मागणी आहे.
दोन्ही देशांचा व्यापार हा आता जवळपास 15 अब्ज डॉलरच्या आसपास पोहोचला आहे. फ्रान्स हा भारताचा एक विश्वासू व्यापारी भागिदार देश म्हणून आता समोर येत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून फ्रान्समध्ये मोठं आंदोलन सुरू आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. जाळपोळ सुरू आहे. या आंदोलनामध्ये फ्रान्समधील मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.