माजी मुख्यमंत्र्यांची आधी पक्ष सोडण्याची तयारी, नंतर घेतला यु-टर्न; आता म्हणाले…

माजी मुख्यमंत्र्यांची आधी पक्ष सोडण्याची तयारी दर्शवली होती. आता त्यांनी यु-टर्न घेतला आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं .

माजी मुख्यमंत्र्यांची आधी पक्ष सोडण्याची तयारी, नंतर घेतला यु-टर्न; आता म्हणाले...
congess
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 8:11 PM

उत्तराखंड काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हरिश रावत यांनी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काँग्रेस पक्षाची सर्व पदे सोडण्याची तयारी दर्शवली. त्यांनी म्हटलं की, माझे पीए चंदन सिंह यांचं नाव परीक्षा घोटाळा आणि ओएमआर त्रुटींमध्ये दोषी आढळल्यास शरमेची बाब ठरेल’. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पक्षाची सर्व पदे सोडण्याची इच्छा दर्शवली होती. यानंतर आता काही तासांतच त्यांनी भूमिका बदलली आहे. माझ्या रक्तात आणि हाडात काँग्रेस भिनलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

हरिश रावत म्हणाले, ‘मी काँग्रेस सोडल्याचे वृत्त माध्यमातून समोर येत आहे. परंतु काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व माझ्या रक्तात आणि हाडात भिनलेलं आहे. हरिश रावत म्हणजे सर्व काही काँग्रेस पक्ष असून ते माझ्यासोबत स्वर्गात जाईल. ईडीची खोटी कारवाई, कालच्या वक्तव्याने काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याच्या भूमिकेवर परिणाम होत असेल, तर माझी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यत्व आणि राष्ट्रीय कार्यकारी कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची तयारी आहे’.

हरिश रावत यांनी म्हटले होतं की, ‘माझा पीए चुकीचा असू शकत नाही’. त्यांनी पुढे म्हटलं की, माजी स्वीय सहायकांच्या घरी ईडीने छापा टाकला. त्यानंतर ईडीने त्यांच्या घरातील रोकड आणि दागिने जप्त केले होते. यावरून हरिश रावत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला होता. त्यांनी थेट राजीनामा शस्त्र उगारलं होतं. हरिश रावत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, माध्यमांवर बातम्या येत आहेत की, माजी ओएसडीकडील रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. जीना हे माझे ओएसडी होते. या घटनेमागचं सत्य समोर येईल. मी पक्षात आणि सरकारमध्ये जी काही पदे भूषवले होते, त्यावेळी जीना यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. रावत पुढे म्हणाले, उत्तराखंडच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. गंमतीने म्हणायचो की, आता दारावर सीबीआय येईल. तेव्हाच निवडणुका होतील. आता दारावर न जाता एका सहकाऱ्याच्या दारावर जाऊन षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us