महाकुंभ फेम 32 वर्षांची मॉडेल हर्षा हीने केले स्वत:चे पिंडदान, धारण केले नवे नाव..

हिंदू धर्मात पिंडदान पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते. मात्र, एका ३२ वर्षांच्या मॉडेल आणि एन्फ्लुएंसर हर्षा रिछारिया हीने स्वत:चे पिंडदान करीत संन्यास घेतल्याने खळबळ उडाली आहे.

महाकुंभ फेम 32 वर्षांची मॉडेल हर्षा हीने केले स्वत:चे पिंडदान, धारण केले नवे नाव..
Harsha Richhariya
| Updated on: Apr 20, 2026 | 10:20 PM

प्रयागराज येथील ‘महाकुंभ’ पासून चर्चेत आलेली मॉडेल आणि एन्फ्लुएंसर हर्षा रिछारिया हीने स्वत:चे पिंडदान केले आहे आणि संन्यास घेतला आहे. तिने म्हटले आहे जी नाती गरजेला कामी येत नाहीत, अशा नात्यांचा पिंडदान करण्यास दु:ख कसले ? मध्य प्रदेशातील उज्जैन येथे हर्षा रिछारिया हीने तिच्या गुरुंच्या उपस्थितीत तिचे पिंडदान केले आणि संन्यास घेतला आहे. ती ३२ वर्षांची असून या वयात तिने आपले पिंडदान करुन संन्यास घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे अनुष्ठान उज्जैन स्थित मौन तिर्थ आश्रमात महामंडलेश्वर सुमनानंद महाराजांच्या उपस्थित पार पडले. येथे परंपरेनुसार तिला संन्यासाची दीक्षा देण्यात आली. चला शास्रानुसार हिंदू धर्मात महिला असे करु शकतात का ? शास्र काय म्हणते ?

हर्षा रिछारिया हीला मिळाले नवे नाव

या विशेष अनुष्ठानानंतर हर्षा रिछारिया हीला स्वत:चे नवीन नाव मिळाले आहे. आता ती स्वामी हर्षानंद गिरी या नावाने ओळखली जाईल. अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर हर्षा रिछारिया हीने म्हटले की आता नवीन जीवनाला सुरुवात झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून ती या मार्गावर पुढे चालली होती. तिला खूप विरोधही झाला. खूप काही झाले. मग मनात विचारही आला की या मार्गाला सोडूयात. कारण ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या साथीसाठी ती हे सर्व करत होती, तेच साथ देत नव्हते. मग कोणासाठी हे करायचे ?

पिंडदानानंतर हर्षा रिछारिया हीने काय केले ?

हर्षा रिछारिया हीने पुढे सांगितले की जेव्हा तिने विचार केला की यास सोडून देईल, मग आतून प्रश्न आला की ती याला सोडू शकते. धर्माच्या मार्गावर एकदा चालल्यानंतर त्यास सोडण्याचा कोणी विचार करु शकत नाही. तिला वाटले की ती यातून निघू शकणार नाही. तिने पुढे सांगितले की ती खूप काळापासून संन्यास घेण्या संदर्भात विचार करत होती. तेव्हा तिला सौभाग्य मिळाले की आज हे शक्य होऊ शक्य. आता एक नवीन सुरुवात असेल. तिने सांगितले की आतापर्यंत तिने केवळ तिचे कुटुंब, आई-वडील आणि स्वत:पुरता विचार करत होती. परंतू आता गुरुजींच्या मार्गदर्शनात धर्म आणि समाजासाठी विचार करेल.

जीवंत व्यक्ती पिंडदान करु शकतो ?

हिंदू धर्मात जीवंत महिला स्वत:चे पिंडदान करु शकतो की नाही ?हिंदू धर्मात पितरांच्या शांतीसाठी केले जाणाऱ्या प्रमुख कर्मकांडात पिंडदानाला विशेष महत्व आहे. परंपरागत मान्यते नुसार हे अनुष्ठान केवळ मृत पूर्वजांच्या आत्म्याच्या तृत्पी आणि मोक्षप्राप्तीसाठी केले जाते. गरुड पुराण आणि अन्य धर्मशास्रात स्पष्ट उल्लेख आहे की पिंडदान मृतकांसाठी निर्धारित आहे. काही विशिष्ट परिस्थितीत अपवाद पाहायला मिळतात. विद्वानांनुसार संन्यास घेणारी व्यक्ती आपल्या सांसारिक जीवनाचा त्याग करण्याचा प्रतिकाच्या रुपात स्वत:चे पिंडदान करु शकतात. तसेच गया सारख्या धार्मिक स्थळांवर काही लोक जीवंत असतानाच स्वत:चे पिंडदान करतात, म्हणजे नंतर कुटुंबांवर जबाबदारी नको.

Follow Us