बीळ सापाचं आहे की उंदराचं कसं ओळखायचं? हे फरक तुम्हालाही माहिती नसतील

उंदीर ही सापांची सर्वात आवडती शिकार आहे. त्यामुळे ज्या परिसरात जास्त उंदीर असतात, त्या परिसरामध्ये साप देखील आढळून येतात. विशेष म्हणजे उंदीर देखील बिळात राहतात, आणि साप देखील बिळातच लपून बसतात. अनेकदा आपण ज्या बिळाला उंदरांचं बीळ समजतो ते सापाचं बीळ देखील असू शकतं.

बीळ सापाचं आहे की उंदराचं कसं ओळखायचं? हे फरक तुम्हालाही माहिती नसतील
उंदिर अन् सापांच्या बिळामधील फरक
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 10:01 PM

तसं पाहिलं तर साप हा मानवाचा मित्र आहे. कारण सापांमुळे उंदरांची संख्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे पिकांची नासाडी देखील कमी होते. ज्या परिसरात साप कमी आहेत, अशा परिसरामध्ये उंदरांची संख्या ही खूप जास्त प्रमाणात वाढते. उंदरांमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अन्नधान्यांची नासाडी होते. जर उंदरांची संख्या नियंत्रणात राहिली तर मोठ्या प्रामाणात नासाडी टळते. साप हा उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवणारा नैसर्गिक उपाय आहे. तो नैसर्गिक पद्धतीने उंदरांच्या संख्येवर नियंत्रण आणतो. म्हणून साप हा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र अनेकदा आपण कुठेही साप दिसला की त्याला लगेच मारतो. परंतु तसं न करता तुम्ही जर तुमच्या परिसरातील सर्पमित्रांना या सापाची माहिती दिली तर ते सापांना सुरक्षित रेस्क्यू करतील.

साप कुठेही राहू शकतो, जसं की जमिनीवर, झाडावर परंतु अनेक साप असे असतात, की ते बीळातच राहतात. फक्त कधी-कधी शिकारीच्या शोधात ते जमिनीवर आल्याचं पहायला मिळतं. साप बिळात राहण्याचं आणखी एक कारण आहे, कारण उंदीर देखील बिळात लपून बसतात. त्यामुळे सापांना अशा ठिकाणी सहज शिकारीची सोय होते. मात्र सापांचं बीळ आणि उंदरांचं बीळ हे वेगवेगळं असतं. यातील फरक अनेकांच्या लक्षात येत नाही. अनेकदा आपण सापांचं बीळ हे उंदरांचं बीळ समजण्याची चूक करतो. मात्र यातील फरक माहिती असणं गरजेचं असतं.

Loading...

काय आहे सांपाच्या आणि उंदराच्या बिळात फरक?

उंदीर हे आपले नखे आणि दात यांचा वापर करून नवं बीळ तयार करतात. त्यामुळे ज्या बिळाशेजारी मातीचा ढिगारा असेल किंवा माती जमा झालेली दिसेल तर ते बीळ हे उंदराचं आहे, असं ओळखावं, या उलट साप कधीही स्वत:च बीळ तयार करत नाही. तो इतर प्राण्यांची किंवा उंदराची बीळ ताब्यात घेतो. त्यामुळे जर तुम्हाला एखादं जुनं बीळ दिसलं तर त्या बीळात साप असू शकतो, असं समजावं. तसेच उंदराचं बीळ हे तुलनेनं थोडं लहान असतं, परंतु सापाचं बीळ हे मोठं असतं. सापाच्या बिळाजवळ कधीही तुम्हाला मातीचा ढिगारा दिसणार नाही, तसेच अन्न-धान्याचे कण देखील दिसणार नाहीत. जे उंदराच्या बिळाजवळ तुम्हाला दिसू शकतात. तसेच कधी-कधी जर परिसरात सापाची कात दिसली तर ते सापाचचं बीळ असण्याची शक्यता असते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us