Abhijit Dipke Education: किती शिकलेले आहेत अभिजीत दीपके ?

सोशल मीडियातून अनेकदा आंदोलने उभी राहताना दिसत असतात. अभिजीत दीपके या तरुणाने देखील अशीच कॉक्रोच जनता पार्टी (CJP) काढली तो रातोरात स्टार झाला आहे.

Abhijit Dipke Education: किती शिकलेले आहेत अभिजीत दीपके ?
Abhijit Dipke
| Updated on: May 21, 2026 | 4:01 PM

सोशल मीडियात कोण रंकाचा राव कधी होईल हे सांगता येत नाही. या व्हर्च्युअल जगात कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल आणि कोणते आंदोलन हवा पकडेल हे कोणीही सांगू शकत नाही. गेल्या काही दिवसात कॉक्रोच जनता पार्टी (CJP) नावाने काढलेले डिजिटल पेज असेच भयानक व्हायरल झाले आहे. त्याच्या लोकप्रियतेने सर्वांना धक्का बसला आहे.कोर्टातून तरुणावर झालेल्या एका टिप्पणीच्या आधारे सुरु झालेले ही अनोखी मोहिमेने इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर देशाच्या अनेक राजकीय पक्षांना लोकप्रियतेत मागे टाकले आहे. या मोहिमेच्या मागचे डोके एका सुशिक्षित तरुणाचे आहे. हा तरुण किती शिकलेला आहे हे पाहूयात…

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका कठोर टिप्पणीपासून झाली. भारताचे मुख्य सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी देशाच्या काही खास बेरोजगारांचा वागण्यावरुन त्यांचा ‘कॉकरोच’असा उल्लेख केला. या वक्तव्यालाच तरुणांनी आपली ढाल बनवली आणि सोशल मिडियावर व्यंगात्मक अंदाजात ‘कॉक्रोच जनता पाटी’ची पायाभरणी केली. ही आयडिया इंटरनेटवर अशी क्लिक झाली की लोक या मजेदार आणि अनोख्या विरोधी निदर्शनाशी जोडले गेले.

इंस्टाग्रामवर सत्ताधारी भाजपाला पछाडले

या डिजिटल पार्टीची ताकदीचा अंदाज यावरुन लावू शकतो की इंस्टाग्राम हँडल @cockroachjantaparty च्या आकड्यांवरुन लावता येऊ शकतो. या पेजने फॉलोअर्सच्या रेसमध्ये जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पार्टी (BJP)देखील खूप मागे टाकले. ताजा माहितीनुसार या पार्टीच्या इंस्टा पेजवर फॉलोअर्सची संख्या १०.३ मिलियन ( १.०३ कोटी ) चा आकडा पार केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियाचे सारे आधीचे रेकॉर्ड तुटले आहेत. भारतीय जनता पार्टचे इंस्टाग्रामवर सध्या ८.७ मिलियन फॉलोअर्स आहेत.

किती शिकलेले आहेत अभिजीत ?

कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करणाऱ्या तरुणाचे नाव अभिजीत दीपके आहे.त्यांचे वय केवळ ३० आहे. अभिजीत काही सर्वसामान्य इंटरनेट युजर नाही. तर ते खूप शिकलेले आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या पुणे शहरातून जर्नालिझममध्ये त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आहे. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला.
जेथे त्यांनी प्रसिद्ध बोस्टन युनिव्हर्सिटीतून पब्लिक रिलेशन ( पीआर ) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण केले आहे.
डिजिटल नॅरेटिव्ह बनवण्यात एक्सपर्ट

अभिजीत दीपके पेशाने एक पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटजिस्ट आहेत. जे राजकीय पक्षांसाठी डिजिटल रणनिती तयार करत असतात. ते इंटरनेट मीडियावर कोणत्याही मुद्याला हवा देण्यात, त्याचा प्रसार करण्यात आणि योग्य संदेश पोहचवण्यात माहिर आहेत. डिजिटल माध्यमांद्वारे राजकीयल कल प्रभावित करण्यात ते एक्सपर्ट आहेत. इतक्या मोठ्या डिग्री असूनही आणि सोशल मिडिआत तहलका माजवूनही अभिजीत यांनी एका मुलाखतीत सांगितले की सर्वसामान्य तरुणासारखे ते नोकरीसाठी सतत अर्ज करत आहेत.

Follow Us