विमान प्रवासी वाहतूक कंपनी सुरू करण्यासाठी किती खर्च येतो? एक दिवसाचा नफा किती असतो?

एक विमान कमी सुरू करण्यासाठी कमीत कमी किती खर्च येतो? त्यासाठी काय करावं लागतं? किती भांडवलाची आवश्यकता असते, तसेच तुम्हाला एका दिवसामध्ये किती नफा मिळू शकतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

विमान प्रवासी वाहतूक कंपनी सुरू करण्यासाठी किती खर्च येतो? एक दिवसाचा नफा किती असतो?
एक विमान कंपनी सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 25, 2026 | 9:36 PM

शंख एअर या विमान कंपनीला आता भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळताच कंपनी उड्डाणासाठी सज्ज झाली आहे. या कंपनीने लखनौ आणि नोएडामधून आपली विमान सेवा सुरू केली आहे. सध्या ही कंपनी देशभरात चांगली चर्चेचा विषय ठरली आहे. शंख एअर या कंपनीने एअरलाइन्स क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर आता एक विमान कंपनी सुरू करण्यासाठी कमीत कमी किती खर्च येतो? आणि एका दिवसाचा नफा किती असू शकतो, याबाबत अनेक उद्योजक तसेच सामान्य माणसांच्या मनात देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.

विमान कंपनी सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?

Loading...

भारतामध्ये जर तुम्हाला प्रवासी वाहतूक विमान कंपनी सुरू करायची असेल तर त्यासाठी सरकारने अत्यंत कडक नियम बनवले आहेत. डीजीसीए (DGCA)च्या नव्या नियमानुसार जर एखाद्या कंपनीला शंख एअरसारखी देशांतर्गत विमान सेवा सुरू करायची असेल तर कमीत कमी अशा कंपनीकडे सुरुवातीला 50 कोटी रुपयांचा फंड असणं गरजेचं आहे. हा फक्त सरकारी आकडा आहे. मात्र वास्तवात जर तुम्हाला विमान कंपनी सुरू करायची असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 500 कोटी ते 1500 कोटी रुपयांचं भांडवलं असणं गरजेचं आहे.

जर तुम्हाला एक साधं एअरबस A320 किंवा बोइंग विमान जरी खरेदी करायचं असेल तर त्याची किंमत 800 कोटी ते 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. एवढी रक्कम एकाचवेळी कोणाला देणं हे कोणत्याही कंपनीसाठी शक्य नसतं, त्यामुळे जगातील अनेक कंपन्या या विमान थेट खरेदी न करता ते भाड्यानेच घेणं पसंत करतात. जगभरात जेवढ्या काही कंपन्या आहेत, त्यातील जवळपास 50 टक्के कंपन्यांकडे स्वत:च विमान नाही, ते विमान भाड्यानेच घेतात. तुम्ही जर एखादं विमान भाड्याने घेतलं तर त्यापोटी तुम्हाला संबंधित कंपनीला दर महिन्याला तीन ते चार कोटी रुपये द्यावे लागतात. तसेच तुम्हाला जर प्रवासी वाहतूक करण्याचं लायसन्स मिळवायचं असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 5 विमानं असणं गरजेचं असतं.

एका दिवसात किती नफा होतो?

विमान क्षेत्रात नेट प्रॉफिटचं मार्जीन हे खूपच कमी असतं, म्हणजे एखाद्या कंपनीचा जवळपास 80 ते 85 टक्के खर्च हा वाहतुकीवर होतो, त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त पाच ते दहा टक्के एवढाच नफा राहू शकतो. सुरुवातीच्या काळात तर तुम्हाला कोट्यवधि रुपये खिशातूनच घालावे लागतात.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us