ओवैसींच्या बालेकिल्ल्यात राजकीय नेत्याची धारदार शस्त्राने हत्या; रस्त्यावर तडफडून जीव सोडला, राजकीय वर्तुळात खळबळ

ओवैसींच्या बालेकिल्ल्यात AIMIMच्या नेत्याची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना घडली आहे. हल्ल्यानंतर या नेत्याने रस्त्यावर तडफडून जीव सोडला. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ओवैसींच्या बालेकिल्ल्यात राजकीय नेत्याची धारदार शस्त्राने हत्या; रस्त्यावर तडफडून जीव सोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
AIMIM Leader
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 31, 2026 | 1:54 PM

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या पक्षातील नेत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. हैदराबादच्या ओल्ड सिटी भागात रविवारी रात्री स्थानिक नेते महबूब अली यांच्या अज्ञातांनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, स्थानिक नेत्याची हत्या ही रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वटट्टेपल्ली येथील गुंटल शाह बाबाच्या दर्ग्याजवळ झाली. विभाग प्रमुख राहिलेल्या महबूब अली यांच्यावर 5 ते 6 जणांच्या गटाने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महबूब गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  मात्र महबूब यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

महबूब यांनी तडफडून सोडला जीव 

पोलिसांच्या माहितीनुसार, महबूब अली हे अलमास हॉटेलजवळ उभे होते. त्यावेळी काही लोकांनी महबूब यांना घेरलं. त्यानंतर त्यांनी महबूब यांना चाकूने हल्ला केला. या जीवघेणा हल्ल्यात महबूब अली गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर जवळपास 15 मिनिटे रस्त्यावर तडफडत होते. या घटनेनंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये स्थानिक नेते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसत आहे.

पोलिसांकडून तपास सुरू 

पोलिसांनी अद्याप हत्येचं कारण स्पष्ट केलेलं नाही. त्यांच्या हत्येचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. राजकीय वादातून हत्या झाल्याचा कारणालाही पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. काही रिपोर्टनुसार, काळ्या जादूच्या कारणातून महबूब यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 3 विशेष पथक गठीत करण्यात आलं आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरून वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला जात आहे. तसेच या प्रकरणी साक्षीदारांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. मेहबूब यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महबूब यांच्या कुटुंबीयांनी आरोपींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तर स्थानिकांनी हत्येच्या घटनेवरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

Follow Us