India Hypersonic Missile : कसं रोखणार? चीन-पाकिस्तानकडे उत्तरचं नाही, भारताचं हायपरसोनिक मिसाइल रेडी

India Hypersonic Missile : सध्या जगातील मोजक्या देशांकडे जे मिसाइल तंत्रज्ञान आहे, त्यात आता भारताचा समावेश झाला आहे. भारताने पहिलं हायपरसोनिक मिसाइल विकसित केलं आहे. या मिसाइलची रेंज, क्षमता सर्वकाही जाणून घ्या.

India Hypersonic Missile : कसं रोखणार? चीन-पाकिस्तानकडे उत्तरचं नाही, भारताचं हायपरसोनिक मिसाइल रेडी
india hypersonic missile
| Updated on: Oct 19, 2026 | 5:20 PM

मिसाइल टेक्नोलॉजीमध्ये भारताने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. सध्या हायपरसोनिक मिसाइल जगातील निवडक देशांकडे आहे. भारत हायपरसोनिक मिसाइल बनवण्याच्यादिशेने वेगाने पावलं टाकत आहे. DRDO ने बनवलेलं लॉन्ग रेंज अँटी-शिप मिसाइल (LR-AShM) म्हणजे LRHM हायपरसोनिक मिसाइल 2027 ते 2029 दरम्यान सैन्य सेवेत त्याचा समावेश होऊ शकतो. या मिसाइलची रेंज जवळपास 1500 किलोमीटर आहे. हायपरसोनिक गतीने टार्गेट भेदणं सहज शक्य आहे. सुरुवातील प्रतिवर्ष 10 ते 15 मिसाइल्सची निर्मिती केली जाईल. नंतर 20 ते 25 यूनिटपर्यंत उत्पादन प्रतिवर्ष वाढवलं जाईल. LR-AShM एका बूस्ट ग्लाइड हायपरसोनिक मिसाइल आहे. दोन स्टेजच्या सॉलिड रॉकेट मोटर मधून हे मिसाइल लॉन्च होतं. हायपरसोनिक ग्लाइड व्हीकल म्हणून ते आपल्या लक्ष्याचा दिशेने झेपावतं. 12348 किलोमीटर प्रती तास वेगाने हे मिसाइल आपल्या लक्ष्याच्या दिशेने झेपावेल. 1500 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचायला या मिसाइलला 15 मिनिटाचा वेळ लागू शकतो. शत्रूच्या युद्धनौकांना हे मिसाइल सहज टार्गेट करु शकतं.

या मिसाइलच्या उड्डाणाचा मार्ग कठिण आणि अनिश्चित आहे. शत्रूचे रडार आणि इंटरसेप्टर या मिसाइलला सहजासहजी रोखू शकत नाही. भारतीय नौदलासाठी हे मिसाइल विकसित केलं जातय. भविष्यात जहाज आणि हवेतून लॉन्च होणारं मिसाइल सुद्धा विकसित केलं जाईल. स्वदेशी सेंसर आणि एवियोनिक्स सिस्टिममुळे हे अधिक अचूक आणि घातक आहे.

Loading...

सुरक्षेच्या दृष्टीने हे मिसाइल गेम चेंजर

DRDO ने या मिसाइलच्या अनेक यशस्वी चाचण्या केल्या आहेत. ओदिशाच्या किनाऱ्यावर झालेल्या चाचण्यांमध्ये 1500 किलोमीटरची रेंज आणि टर्मिनल गाइडन्स पुष्टि झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सुद्धा हे मिसाइल प्रदर्शित झालं आहे. आता सीरियल प्रोडक्शनचा टप्पा सुरु झाला आहे. मूल्यांकन परीक्षणानंतर या मिसाइलचा सैन्य दलात समावेश होईल. हायपरसोनिक मिसाइलची निर्मिती भारताच्या आत्मनिर्भरतेचा महत्वपूर्ण हिस्सा आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनीच सध्या हे जटिल तंत्रज्ञान मिळवलं आहे. हिंद महासागर क्षेत्रात भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मिसाइल गेम चेंजर ठरु शकतं.

पारंपारिक जहाज विरोधी मिसाइलच्या तुलनेत या मिसाइलची रेंज आणि स्पीड खूप जास्त आहे. ब्रह्मोसपेक्षा पण या मिसाइलची गती जास्त आहे. या मिसाइलमुळे भारताची समुद्री ताकद वाढणार आहे तसचं प्रतिरोधक क्षमता वाढणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us