इराण-अमेरिका युद्धादरम्यान रशियानं जगाची झोप उडवली, थेट 65 हजार सैन्य, 73 युद्ध नौका अन् 140 एयरक्राफ्ट…, मोठी खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील त्यांच्यामधील संघर्ष अजूनही संपलेला नाही, तर दुसरीकडे रशियामध्ये घडामोडींना वेग आला आहे.

इराण-अमेरिका युद्धादरम्यान रशियानं जगाची झोप उडवली, थेट 65 हजार सैन्य, 73 युद्ध नौका अन् 140 एयरक्राफ्ट..., मोठी खळबळ
Vladimir Putin
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 20, 2026 | 10:09 PM

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही संघर्ष कायम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली आहे. आम्ही इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही, इराणने लवकरात लवकर अण्वस्त्र करार करावा अन्यथा आम्ही इराणवर पुन्हा हल्ला करू आमचं सैन्य तयार आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांनी देखील इराणला धमकी दिली आहे, इराणला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अण्वस्त्र तयार करू देणार नाहीत, इराणने अण्वस्त्र तयार केल्यास जगभरात अण्वस्त्र तयार करण्याची स्पर्धा लागेल. न्युक्लिअर व्हेपन्स हा अतिशय संवेदनशील विषय आहे, असं जेडी वेंस यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही युद्धाच्या मार्गाने जाण्यापासून वाचत आहोत, परंतु जर तशीच वेळ आली तर आमचं सैन्य तयार आहे, असंही वेंस यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरू असताना आता दुसरीकडे संपूर्ण जगाचं लक्ष रशियाकडे लागलं आहे. रशियाने युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच आता आपला शेजारी देश असलेल्या बेलारूससोबत मिळून 3 दिवसांचा आण्विक लष्करी सराव सुरू केला आहे. ज्यामध्ये 200 रॉकेट लाँचंर, 140 एयरक्राफ्ट 73 युद्धनौका, 13 पाणुबड्या आणि 65 हजार सौनिक सहभागी झाले आहेत. याबाबत माहिती देताना रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे की, या युद्ध अभ्यासामध्ये तब्बल 7800 प्रकारचे शस्त्र आणि संरक्षण प्रणाली यंत्रणा सहभागी केली जाणार आहे. या युद्धाभ्यासाला 19 मे पासून सुरुवात झाली आहे, 21 मे पर्यंत हा युद्धाभ्यास सुरू राहणार आहे.

दरम्यान हा युद्धाभ्यास अशावेळी होत आहे, ज्यावेळी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे चीनच्या दौऱ्यावर आहेत. चीनमध्ये त्यांनी अनेक करारावर स्वाक्षरी केली आहे. दरम्यान युक्रेन आणि रशियामध्ये अजूनही युद्ध सुरूच आहे. तब्बल 4 वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. याचदरम्यान अनेकदा रशियाकडून आपल्या आण्विक शस्त्रांच प्रदर्शन देखील करण्यात आलं आहे. युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देखील रशियाचं हे शक्ती प्रदर्शन महत्त्वाचं मानलं जात आहे.

Follow Us