India-China : बॉर्डरवर चीनने पुन्हा लायकी दाखवली, अरुणाचल प्रदेशबद्दल महत्वाची अपडेट

India-China : अरुणाचल प्रदेश मधल्या स्थितीबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. ITBP चे महासंचालक शत्रुजीत सिंह कपूर यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक स्तरावर भारतीय-चीन नियंत्रण रेषेवरील स्थितीबाबत मोठं भाष्य केलं आहे.

India-China : बॉर्डरवर चीनने पुन्हा लायकी दाखवली, अरुणाचल प्रदेशबद्दल महत्वाची अपडेट
India-China Faceoff
| Updated on: Oct 23, 2026 | 11:05 AM

मागच्या काही वर्षात भारत-चीन नियंत्रण रेषेवर अनेकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. चीनकडून वारंवार भारतातील काही भागांवर दावा सांगितला जातो. भारताने नेहमीच चीनचे हे दावे फेटाळून लावले आहेत. चीनच्या दादागिरीला जशास तसं उत्तर दिलं आहे. ITBP चे महासंचालक शत्रुजीत सिंह कपूर यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक स्तरावर भारतीय-चीन नियंत्रण रेषेवरील स्थितीबाबत मोठं भाष्य केलं आहे. जुलै महिन्यापासून अरुणाचल प्रदेशच्या अनेक भागात चीनची PLA आर्मी आणि भारतीय सैन्य आमने-सामने आल्याच्या घटना घडल्या आहेत. राजस्थानच्या अलवरमध्ये आपल्या जवानांना संबोधित करताना शत्रुजीत सिंह कपूर यांनी अरुणाचल प्रदेशमधील स्थितीबाबत माहिती दिली. असफिला सारख्या क्षेत्रात भारत जिथून LAC मानतो, तिथपासून सहा-सात किलोमीटर अंतरावर चिनी सैनिकांनी तंबू टाकले आहेत.

ITBP चे महासंचालक शत्रुजीत सिंह कपूर यांचं हे वक्तव्य यासाठी महत्वाचं आहे कारण देशाच्या उत्तर सीमेवर तणाव वाढत असल्याची ही कबुली आहे. याचा अर्थ असा होतो की, ब्रिक्स परिषदेसाठी चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले होते, त्यावेळी सुद्धा अरुणाचल मध्ये तणाव होता. ITBP ची स्थापना 1962 साली झाली. 3488 किलोमीटर लांबीच्या एलएसीच्या संरक्षणाची जबाबदारी ITBP वर आहे. अशा स्थितीचा पारंपारिक पद्धतीने नाही, तर आधुनिक युद्ध कौशल्याने सामना करण्याची भारतीय सैन्याची तयारी आहे. “चीन भारताचा सर्वात मोठा विरोधक आहे आणि पारंपारिक युद्ध निती आता जुनी झाली आहे” असं शत्रुजीत सिंह कपूर म्हणाले.

Loading...

आयटीबीपीला एक वेगळी ओळख देतील

शत्रुजीत सिंह कपूर यांचं विधान यासाठी महत्वाचं आहे, कारण अरुणाचल मधल्या फेस-ऑफ बद्दल पहिल्यांदाच कुठल्यातरी अधिकाऱ्याने जाहीरपणे मान्य केलं आहे. महासंचालकांनी शौर्य कमांडो प्लाटूनचं कौतुक केलं. कारण आमने-सामनेच्या स्थितीमध्ये त्यांनी चिनी सैन्याला प्रभावी उत्तर दिलं. शौर्य कमांडो आता प्रत्येक बॉर्डर बटालियन मध्ये असतील. आयटीबीपीला एक वेगळी ओळख देतील. आयटीबीपच्या महासंचालकांनी रशिया-युक्रेन आणि इराण-अमेरिका संघर्षाचं उदहारण दिलं. आजच्या काळाच ड्रोन आणि अँटी ड्रोन टेक्नोलॉजी महत्वाची बनली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us