Khan Sir : देशातील प्रसिद्ध खान सरांना होणार अटक? विद्यार्थ्यांच्या सर्वांत आवडत्या शिक्षकाकडे किती पदव्या, काय शिकवतात?

पाटणा इथल्या कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे खान सर देशभरात तुफान चर्चेत आहेत. नेमकं काय घडलं, याप्रकरणी खान सरांना अटक होऊ शकते का, त्यांच्याकडे किती पदव्या आहेत, ते सविस्तर जाणून घ्या..

Khan Sir : देशातील प्रसिद्ध खान सरांना होणार अटक? विद्यार्थ्यांच्या सर्वांत आवडत्या शिक्षकाकडे किती पदव्या, काय शिकवतात?
खान सर
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 07, 2026 | 11:47 AM

युट्यूब किंवा इन्स्टाग्रामवरील रील्स स्क्रोल केले, तर तुम्हाला अनेकदा खास भारतीय शैलीत, हातात लाकडी ग्लोब किंवा नकाशा घेऊन प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मुद्दे अत्यंत चटकदारपणे समजावून सांगणारा एक चेहरा दिसेल. हा चेहरा आहे पाटण्याच्या सुप्रसिद्ध शिक्षक खान सरांचा. आपल्या अनोख्या आणि विनोदी शैलीने देशभरात शिक्षणाचा संदेश पसरवणाऱ्या खान सरांना खरंतर कोणत्याही परिचयाची गरज नाही. पण सध्या ते देशभरात त्यांच्या कोणत्याही क्लास किंवा व्हिडीओमुळे नाही, तर त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे चर्चेत आले आहेत. या खळबळजन घटनेच्या पार्श्वभूमीवर लोक पुन्हा एकदा इंटरनेटवर त्यांच्याबद्दल सर्च करत आहेत. या खान सरांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे आणि ते कोणते विषय शिकवतात, त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर नेमकं काय घडलं, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.. कोचिंग सेंटरच्या बाहेर गोळीबार मंगळवारी पाटण्यातील मुसल्लापूर हाटजवळ खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर गोळीबार झाला. या घटनेत एक सुरक्षारक्षक जखमी झाला असून याप्रकरणी पोलिसांनी मोठी चौकशी सुरू केली आहे. मुसल्लापूर हाटजवळ खान सरांची...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us