पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळील मशि‍दीवरून मोठे वादंग, त्या नोटीसवर का भडकली AIMIM?

AIMIM on Modi Government: दिल्लीत आता एका मशि‍दीला नोटीस बजावल्याप्रकरणात वाद सुरू झाला आहे. AIMIM दिल्ली प्रदेशाध्यक्ष डॉ. शोएब जामेई यांनी रेस कोर्स मशि‍दीला दिलेल्या नोटीसवरून सरकारवर निशाणा साधला आहे. काय आहे हे प्रकरण?

पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळील मशि‍दीवरून मोठे वादंग, त्या नोटीसवर का भडकली AIMIM?
पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळील मशि‍दीवरून मोठे वादंग, का भडकली AIMIM?
| Updated on: Oct 21, 2026 | 10:22 AM

AIMIM on Modi Government: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीनचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष डॉ. शोएब जोमेई यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ऐतिहासिक रेस कोर्स मशीद ही पंतप्रधान निवासस्थान परिसरात आहे. या मशीद कमिटीला 6 दिवसांच्या निष्कासनाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरून वादंग उठले आहे. एआयएमआयएमनुसार देशात गुंडराज सुरू आहे. ही कारवाई योजनाबद्ध पद्धतीने सुरू असल्याचा आरोपही जोमेई यांनी केला आहे. ही मशीद दिल्लीच्या गॅझेट नोटिफिकेशनमध्ये नमूद आहे. तरीही तिच्या पाडकामाची भाजप सरकार तयारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही मशीद वाचवण्यासाठी लवकरच आंदोलन करण्याची हाकही जोमेई यांनी दिली.

शोएब जोमई म्हणाले काय?

Loading...

जोमई यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात दिल्लीत एक अजून मशीद तोडण्याचे षडयंत्र सुरू आहे. रेस कोर्स रस्त्यावर मशीद ही 1977 च्या गॅझेट नोटिफिकेशनमध्ये नोंदवली गेलेली आहे. ही मशीद 125 वर्षे जुनी आहे. त्यावर आता सरकारची वक्रदृष्टी आहे. प्रशासनाचे अधिकारी येतात आणि धमकी देतात. देशात गुंडाराज सुरू आहे का? असा सवालही शोएब जोमई यांनी केला.

रेस कोर्स रोडवरील मशि‍दीची कागदपत्रे आम्ही शोधली. तेव्हा ही मशीद शंभरहून अधिक वर्षे जुनी असल्याचे दिसून आले. 1977 मध्ये दिल्लीच्या गॅझेट नोटिफिकेशनच्या अनुक्रमांक 18 मध्ये ती नोंदणीकृत आहे. हे सर्व काम वक्फ बोर्डातंर्गत झाले आहे. हे सर्व काम कायद्याच्या परिघात राहून करण्यात आले आहे. तरीही अचानक अशी नोटीस बजावणे हे संयुक्तिक तर नाहीच पण निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले.

जी वास्तू ही नोटिफिकेशनमध्ये अधिकृतपणे नोंदवलेली आहे. ती वास्तू 125-150 वर्षे जुनी आहे. पण एक अधिकारी येतो आणि ही ऐतिहासिक वास्तू तोडण्याची धमकी देतो. आठवडाभरात मशीद पाडण्याची खुली धमकी देतो, या देशात गुंडाराज सुरू आहे का? असा सवाल त्यांनी केला.

प्रकरण तरी काय?

दिल्लीतील रेस कोर्स परिसरातील सरकारी जमिनी मोकळ्या करण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या जमीन आणि विकास कार्यालयाने 19 ऑक्टोबर 2026 रोजी 7 लोक कल्याण मार्ग (पंतप्रधान निवासस्थान) जवळील मशि‍दीला सहा दिवसात निष्कासनाची, जागा खाली करण्याची नोटीस बजावली आहे. त्याला आता जोरदार विरोध सुरू झाला आहे. जमियत उलेमा ए हिंदच्या शिष्टमंडळाने तातडीने अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची मुलाखत घेत त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us