Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेदाबाबत मोठा खुलासा, RTI मधून नवीन माहिती समोर, नेमकं काय घडलं होतं?

Gyanesh Kumar-Sukhbir Singh Sandhu and Vivek Joshi: केंद्रीय निवडणूक आयोगातील कथित मतभेदावर आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात आला होता. त्याबाबत आता माहिती अधिकारातून एक मोठा खुलासा समोर आला आहे.

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेदाबाबत मोठा खुलासा, RTI मधून नवीन माहिती समोर, नेमकं काय घडलं होतं?
केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेदाबाबत मोठा खुलासा, RTI मधून नवीन माहिती समोर, नेमकं काय घडलं होतं?
| Updated on: Oct 22, 2026 | 8:07 AM

Election Commission of India RTI: केंद्रीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयोगातील कथित मतभेदावर मोठा खुलासा समोर आला आहे. मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार विरोधात इतर निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी असा सामना रंगल्याचा दावा करण्यात आला होता. या दोघांनी 29 जुलै रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केल्याचा दावा करण्यात येत होता. याघटनेविषयी आता माहिती अधिकारातून मोठा खुलासा समोर आला आहे.

RTI मधून काय आले समोर?

Loading...

या वादावर माहिती अधिकारात माहिती मागवण्यात आली होती. RTI मध्ये मिळालेल्या उत्तरानुसार, दोन्ही आयुक्तांची पत्रे पंतप्रधान कार्यालय, PMO ऑफिस, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवांना प्राप्त झाली होती.कॅबिनेट सचिवालयाच्या नोंदीनुसार, 30 जुलै रोजी या पत्रांची रीतसर नोंद करण्यात आली. डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्या पत्राची नोंद डायरी क्रमांक CS/300/2026 तर डॉ. विवेक जोशी यांच्या पत्राची नोंद CS/7289/2026 या क्रमांकावर नोंदवण्यात आली आहे.

एकूण 14 पानांचा रेकॉर्ड

पत्रांची नोंद झाल्यावर त्याला अवघ्या आठवड्याभरात प्रत्युत्तर देण्यात आले. 5 ऑगस्ट रोजी कॅबिनेट सचिवांनी पत्र व्यवहार करत दोन्ही निवडणूक आयुक्तांना लेखी उत्तर पाठवले. या संपूर्ण पत्रव्यवहाराची प्रत कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे सचिव, विभागाचे अस्थापना अधिकारी आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या कार्यालयीन अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आणि फाईल नोटिंग मिळून एकूण 14 पानांचा एक अहवाल तयार झाल्याची माहिती समोर येत आहे.

पत्रात मजकूर काय? उत्तर काय?

दोन्ही निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात कामकाजाच्या वाटपावरून हे पत्र धाडल्याचे समजते. 28 जुलैच्या या पत्राआधारे इंडियन एक्सप्रेसने दावा केला होता की SIR प्रक्रिया आणि इतर मनमानी कारभाराविरोधात हे पत्र धाडण्यात आले होते. आता आरटीआयमध्ये असा पत्रव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्याला प्रत्युत्तर दिल्याचेही समोर आले आहे. पण ग्यानबाची मेख समोर आहे. निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी पत्रात काय म्हटले आणि केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी त्याला काय उत्तर दिले हे मात्र गुलदस्त्यातच आहे. त्याची माहिती समोर आलेली नाही. पण जळल्याशिवाय धूर निघत नाही असा विरोधकांचा दावा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us