रशियाचं मित्र भारताला कधीही न विसरता येणारं गिफ्ट, पुतिन बनले संकटमोचक, सर्वात मोठी गुड न्यूज

स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इराण आमने-सामने आहेत. मध्य पूर्वेत संघर्ष सुरू असतानाच आता भारतासाठी रशियामधून एक गुड न्यूज समोर आली आहे. भारताचं मोठं संकट टळलं आहे.

रशियाचं मित्र भारताला कधीही न विसरता येणारं गिफ्ट, पुतिन बनले संकटमोचक, सर्वात मोठी गुड न्यूज
vladimir putin
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 21, 2026 | 9:43 PM

अमेरिका आणि इस्त्रायलमधील संघर्ष अजूनही कमी झालेला नाहीये, एकीकडे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील होर्मूजच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी केली आहे. तेल आणि एलपीजी गॅसच्या वाहतुकीसाठी होर्मूज हा जगाची लाईफलाईन समजला जातो. कारण जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील तब्बल 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होते. भारत तर या मार्गाने तब्बल 40 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक करतो. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून या मार्गाने होणारी तेल वाहतूक जवळपास बंदच आहे. याचा मोठा फटका हा भारताला बसला आहे. आखाती देशांमधून भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात या काळात जवळपास 61 टक्क्यांनी घट झाली आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा रशिया भारताच्या मदतीला धावून आला आहे. रशियामधून भारतासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. भारताने मार्च महिन्यात दिवसाला तब्बल 45 लाख बॅरल कच्च तेल आयात केलं आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात भारताचं कच्च्या तेलाच्या आयातीचं प्रमाण हे दुपटीने वाढलं आहे. गंमत म्हणजे मध्य पूर्वेतून येणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये 61 टक्क्यांची घट झाली असताना देखील भारतानं मार्च महिन्यात फेब्रुवारीच्या तुलनेत तेलाच्या आयातीमध्ये दुप्पट वाढ केली आहे. हे सर्व तेल रशियाकडून भारताला निर्यात करण्यात आलं आहे. भारतानं आपल्या तेलाची कमतरता भरून काढण्यासाठी रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीचा सापाटा लावला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत भारतानं रशियाकडून येणाऱ्या कच्च्या तेलाची खरेदी जवळपास दुपटीने वाढवली आहे.

दरम्यान जगाला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत व्हावा, कोणतंही ऊर्जा संकट निर्माण होऊ नये, तसेच कच्च्या तेलाच्या दरावर नियंत्रण राहावं यासाठी आता अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी रशियावरील निर्बंध आता आणखी एका महिन्यासाठी शिथिल केले आहेत. त्यामुळे भारताकडून आता कच्च्या तेलाची निर्यात आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us