मोठी बातमी! महायुतीमधून बड्या नेत्याची तडकाफडकी हकालपट्टी, राजकारणात घडामोडीला वेग
बिहार विधान परिषद निवडणुकीदरम्यान बंडखोरी करणं जेडीयूचे आमदार अनंत सिंह यांना चांगलंच भोवलं आहे. बंडखोरी केल्यामुळे जनता दल युनायटेड(JDU) कडून आमदार अनंत सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बिहारमधून मोठी बातमी समोर येत आहे. बिहार विधान परिषद निवडणुकीदरम्यान बंडखोरी करणं जेडीयूचे आमदार अनंत सिंह यांना चांगलंच भोवलं आहे. बंडखोरी केल्यामुळे जनता दल युनायटेड(JDU) कडून आमदार अनंत सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अनंत सिंह हे मोकामा विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आहेत. जेडीयू प्रदेश अध्यक्ष उमेश कुशवाहा यांनी अनंत सिंह यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निष्कासित केले असून, त्यांच्या पत्नी तथा माजी आमदार नीलम देवी यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. हा आमदार अनंत सिंह यांच्यासाठी मोठा झटका माण्यात येत आहे.
बिहारच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. बिहार विधान परिषद निवडणुकीदरम्यान बंडखोरी करणं जेडीयूचे आमदार अनंत सिंह यांना चांगलंच महागात पडलं आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आणि पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध जाऊन दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता पक्षानं त्यांच्यावर मोठी कारवाई केली असून, अनंत सिंह यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निष्कासित केले असून, त्यांच्या पत्नी तथा माजी आमदार नीलम देवी यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
आधी पक्षातून हाकालपट्टी आता आमदारकीही जाणार?
दरम्यान बंडखोर आमदार अनंत सिंह यांच्याविरोधात जेडीयूकडून अधिक कडक भूमिका घेण्यात आली आहे. पक्षाविरोधी कारवायाचा ठपका ठेवत आधी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, त्यानंतर आता अनंत सिंह यांची विधानसभा सदस्यता तात्काळ रद्द करावी, अशी शिफारस पक्षाकडून करण्यात आली असून, त्या संदर्भात जेडीयूनं विधानसभा अध्यक्षांना अधिकृत पत्र देखील लिहिलं आहे. दरम्यान यावर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणारं हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान पक्षाने विधानसभा अध्यक्षांकडे अनंत सिंह यांची विधानसभा सदस्यता रद्द करण्याची मागणी केल्यामुळे त्यांचं विधानसभेचं सदसत्व रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अनंत सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनंत सिंह हे बिहारमधील एक मात्तबर नेते म्हणून ओळखले जातात.