Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच, कोरोनाबळींची संख्याही घसरली

| Updated on: Jun 06, 2021 | 9:40 AM

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 88 लाख 9 हजार 339 वर गेला आहे. (New 114460 Corona Cases in India)

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच, कोरोनाबळींची संख्याही घसरली
Maharashtra Corona Virus 07 june 2021
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 6 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 14 हजार 460 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 2 हजार 677 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे (New 114460 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 14 हजार 460 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 677 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 1 लाख 89 हजार 232 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 88 लाख 9 हजार 339 वर गेला आहे. देशात 2 कोटी 69 लाख 84 हजार 781 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 46 हजार 759 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 14 लाख 77 हजार 799 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 23 कोटी 13 लाख 22 हजार 417 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 1,14,460

देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,89,232

देशात 24 तासात मृत्यू – 2677

एकूण रूग्ण –  2,88,09,339

एकूण डिस्चार्ज –2,69,84,781

एकूण मृत्यू – 3,46,759

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 14,77,799

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 23,13,22,417 (New 114460 Corona Cases in India)

संबंधित बातम्या :

नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, संपूर्ण राज्याचं लक्ष

सीरम इन्स्टिट्यूट Sputnik V लसीचंही उत्पादन करणार, DGCI ची मान्यता

(New 114460 Corona Cases in India in the last 24 hours)