Corona Vaccine : नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, संपूर्ण राज्याचं लक्ष

नागपुरातील मेडिट्रिना रुग्णालयात ही चाचणी होणार आहे. लहान मुलांना त्यांच्या वयानुसार 3 गटात विभागून कोरोनाची लस दिली जाणार आहे.

Corona Vaccine : नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, संपूर्ण राज्याचं लक्ष
कोरोना लसीकरण

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असतानाच तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी चिंताजनक असल्याचा अंदाजही अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय. अशावेळी लहान मुलांना कोरोनाची लस महत्वाची ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्यापासून लहान मुलांवर कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता लहान मुलांना कोरोनाचा पहिला डोस दिला जाणार आहे. नागपुरातील मेडिट्रिना रुग्णालयात ही चाचणी होणार आहे. लहान मुलांना त्यांच्या वयानुसार 3 गटात विभागून कोरोनाची लस दिली जाणार आहे. (Corona vaccine will be tested on children in Nagpur)

मेडिट्रिना रुग्णालयात आज 12 ते 18 वयोगटातील मुलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. एकूण 50 मुलांची स्क्रिनिंग घेण्यात आली आहे. याचे रिपोर्ट आल्यावर मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी लहान मुलांचे एकूण 3 टप्पे पाडण्यात आले आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात 12 ते 18 वयोगटातील मुले, दुसऱ्या टप्प्यात 7 ते 11 वयोगटातील मुलं आणि तिसऱ्या टप्प्यात 2 ते 6 वयोगटातील मुलांवर कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

राज्याला मोठा दिलासा

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पाहिला तर आज दिवसभरात 13 हजार 659 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 21 हजार 776 जणांना कोरोनावर मात केलीय. गेल्या तीन महिन्यातील कोरोनाबाधितांचा हा आकडा सर्वात कमी आहे. त्यामुळे राज्यात आता दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यात आतापर्यंत 55 लाख 28 हजार 834 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.01 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आत 300 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर 1.71 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 88 हजार 27 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचंही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. सध्या राज्यात 14 लाख 52 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 7 हजार 93 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,62,71,483 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,19,224 (16.04 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईतील कोरोना स्थिती –

मुंबईत देखील गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज ७ ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 866 नव्या कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला. 1 हजार 45 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 21 हजार 776 जण कोरोनामुक्त, तर 13 हजार 659 नवे रुग्ण

Pune Lockdown Update : पुणे शहर तिसऱ्या टप्प्यात, दुकानांसाठी नवी नियमावली, काय सुरु, काय बंद?

Corona vaccine will be tested on children in Nagpur

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI