Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 21 हजार 776 जण कोरोनामुक्त, तर 13 हजार 659 नवे रुग्ण

गेल्या तीन महिन्यातील कोरोनाबाधितांचा हा आकडा सर्वात कमी आहे. त्यामुळे राज्यात आता दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 21 हजार 776 जण कोरोनामुक्त, तर 13 हजार 659 नवे रुग्ण
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 10:10 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारपासून अनलॉकची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यात 5 टप्प्यांमध्ये राज्यातील जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. या टप्प्यानुसार त्या-त्या जिल्ह्यात नियमावली लागू असणार आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पाहिला तर आज दिवसभरात 13 हजार 659 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 21 हजार 776 जणांना कोरोनावर मात केलीय. गेल्या तीन महिन्यातील कोरोनाबाधितांचा हा आकडा सर्वात कमी आहे. त्यामुळे राज्यात आता दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. (lowest number of corona patients in the last three months)

राज्यात आतापर्यंत 55 लाख 28 हजार 834 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.01 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आत 300 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर 1.71 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 88 हजार 27 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचंही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. सध्या राज्यात 14 लाख 52 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 7 हजार 93 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,62,71,483 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,१९,२२४ (16.04 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईतील कोरोना स्थिती –

मुंबईत देखील गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज ७ ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 866 नव्या कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला. 1 हजार 45 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

दिलासादायक! राज्यात आज 14,152 नव्या रुग्णांची नोंद, 289 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

Pune Lockdown Update : पुणे शहर तिसऱ्या टप्प्यात, दुकानांसाठी नवी नियमावली, काय सुरु, काय बंद?

lowest number of corona patients in the last three months

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.