तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या Ex-IAS दिव्या मित्तल यांच्या नव्या पोस्टने सस्पेन्स वाढला, राजकारणात प्रवेश की..

Former IAS Divya Mittal Next Plan: ऐन उमेदीत आपल्या प्रशासकीय सेवेचे तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या उत्तर प्रदेश कॅडरच्या आयएएस दिव्या मित्तल यांनी सोशल पोस्टकरुन आपल्या आगामी दिशे संदर्भात खुलासा केला आहे.

तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या Ex-IAS दिव्या मित्तल यांच्या नव्या पोस्टने सस्पेन्स वाढला, राजकारणात प्रवेश की..
EX IAS Divya Mittal
| Updated on: Sep 27, 2026 | 8:23 PM

उत्तर प्रदेश कॅडरच्या माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी अचानक राजीनामा दिला होता. आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रशासकीय सेवेतून राजीनामा दिल्यानंतर दिव्या मित्तल यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे. दिव्या मित्तल यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की मला पुढे काय करायचे ? तसेच त्यांनी काही संभाव्य क्षेत्रांचा उल्लेख केला आहे आणि सांगितलंय की २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता या संदर्भात आपण खुलासा करु असे दिव्या मित्तल यांनी म्हटले आहे.

दिव्या मित्तल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय लिहिलंय…

”बच्चे छोटे हैं. अब घर.”
”अच्छा पैकेज मिलेगा. वापस विदेश.”
”IAS पर किताब लिखी है. कोचिंग.”
”टिकट पक्का हो गया होगा. राजनीति.”

या नंतर लिहिलंय की मी, ”29 सप्टेंबर, सकाळी 8:30 वाजता सांगेन”

 

येथे पोस्ट वाचा –

सोशल मीडियावर सक्रीय

दिव्या मित्तल या सोशल मीडियावर चांगल्या सक्रीय आहेत. त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्सवर एकूण 7.55 लाख फॉलोअर्स आहेत. या इंस्टाग्रामवर सुमारे 3.69 लाख, एक्स (ट्विटर)वर सुमारे 2.33 लाख आणि फेसबुकवर सुमारे 1.53 लाख फॉलोअर्स आहेत.

15 सप्टेंबरपासून IAS कारकीर्दीचा प्रवास संपला

2013 च्या बॅचच्या युपी कॅडरच्या आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी 30 ऑगस्ट रोजी प्रशासकीय सेवेतून राजीमाना देण्याची घोषणा केली होती. त्यांनी खाजगी कारणानी,कौटुंबिक प्राथमिकता आणि जीवनातील नवीन धैय गाठयचे असल्याचे सांगत राजीनामा दिला होता. केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. हा राजीनामा
15 सप्टेंबरपासून लागू झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us