J&K NIA Raid : एनआयएची काश्मीर खोऱ्यात छापेमारी; जैशच्या चार ओव्हरग्राउंड वर्कर्सना अटक

| Updated on: Jun 20, 2022 | 10:40 PM

सुरक्षा दलांवरील हल्ल्याचा एनआयएने कसून तपास केला. या तपासादरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेला अनेक पुरावे हाती लागले. त्या पुराव्यांच्या आधारे आज जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात अनेक गुन्हे दाखले आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. यादरम्यान पुलवामा येथील रहिवासी साहिल अहमद खान, जहांगीर अहमद दार, शाहिद अहमद शेरगुजारी आणि इनायत गुलजार भट्ट या चौघांना अटक करण्यात आली.

J&K NIA Raid : एनआयएची काश्मीर खोऱ्यात छापेमारी; जैशच्या चार ओव्हरग्राउंड वर्कर्सना अटक
काश्मीर खोऱ्यात आणखी हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार राहा
Image Credit source: Twitter
Follow us on

श्रीनगर : मार्च महिन्यात पुलवामाच्या छेवा कलान भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सुरक्षा दलांवर हल्ला (Attack) चढवला होता. त्या प्रकरणात आज राष्ट्रीय तपास यंत्रणेने(NIA) जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी (Raid) केली. त्यानंतर जैश-ए-मोहम्मदच्या चार ओव्हरग्राउंड वर्कर्सना अटक करण्यात आली आहे. सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यादरम्यान एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एनआयएने आज धडक कारवाई केल्यामुळे जैश-ए-मोहम्मदचे धाबे दणाणले आहेत. अटक करण्यात आलेले चौघेही आरोपी हे दक्षिण कश्मीरमध्ये दहशतवाद्यांना लपण्याची ठिकाणे तसेच इतर सुविधा आणि गोपनीय माहिती पुरवत होते, अशी माहिती एनआयएच्या तपासादरम्यान हाती लागली आहे. हे चौघे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे ओव्हरग्राउंड वर्कर्स म्हणून काम करत होते, असे एनआयएचे म्हणणे आहे.

सुरक्षा दल व जैशच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने कारवाईबाबत अधिक माहिती दिली. हे प्रकरण दक्षिण काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायांशी संबंधित आहे. 11 मार्च 2022 रोजी छेवा कलान पुलवामा भागात सुरक्षा दल आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत 2 जण ठार झाले होते. पुलवामा येथील आतिफ मुस्ताक भट्ट आणि कमाल भाई अशी त्या दोघांची ओळख पटली होती. तपासादरम्यान कमाल भाई हा मूळचा पाकिस्तानचा असल्याचे निष्पन्न झाले होते. सुरुवातीला हा गुन्हा पुलवामा पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला होता. नंतर तो तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला होता, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

जम्मू-कश्मिरात अनेक ठिकाणी छापेमारी

सुरक्षा दलांवरील हल्ल्याचा एनआयएने कसून तपास केला. या तपासादरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेला अनेक पुरावे हाती लागले. त्या पुराव्यांच्या आधारे आज जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात अनेक गुन्हे दाखले आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. यादरम्यान पुलवामा येथील रहिवासी साहिल अहमद खान, जहांगीर अहमद दार, शाहिद अहमद शेरगुजारी आणि इनायत गुलजार भट्ट या चौघांना अटक करण्यात आली. हे चारही आरोपी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.

हे सुद्धा वाचा

हे लोक इतर तरुणांना जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रभावित करायचे. या चौघांना अटक केल्यानंतर या दहशतवादी संघटनेचे इतर गुन्हेगार कुठे लपले आहेत, याबाबत अधिक चौकशी केली जात आहे. एनआयएने तपासाला गती देत छापेमारी केल्यामुळे जैश-ए-मोहम्मदच्या नेटवर्कला मोठा झटका बसला आहे. (NIA raids Kashmir Valley and arrests four Jaish overground workers)