आफताबवर ‘थर्ड डिग्री’चा वापर नाही, पाच दिवसात नार्को टेस्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश

| Updated on: Nov 18, 2022 | 8:01 PM

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. आरोपी आफताब याची नार्को टेस्ट करण्याचे आदेश दिले आहे.

आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर नाही, पाच दिवसात नार्को टेस्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश
श्रद्धा वालकर
Image Credit source: Social Media
Follow us on

नवी दिल्ली,  श्रद्धा वालकर हत्याकांडातील (Shraddha Walkar Murder) आरोपी आफताबची (Aftab) आता नार्को टेस्ट (Narco test) करावी लागणार आहे. त्यासाठी न्यायालय आणि आरोपी आफताब या दोघांचीही मान्यता घेण्यात आली आहे. आता साकेत न्यायालयाचा आदेश समोर आला आहे, जो 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान दिला होता. यामध्ये पोलिसांना आरोपी आफताबवर थर्ड डिग्री न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासह न्यायालयाने रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबला आफताबची नार्को चाचणी पाच दिवसांत करण्याचे आदेश दिले आहेत.

जेव्हा आरोपीची नार्को टेस्ट केली जाते, तेव्हा त्याची संमतीही आवश्यक असते. आफताबला कोर्टात विचारण्यात आले की, तो नार्को टेस्ट करायला तयार आहे का? तेव्हा त्याचे उत्तर ‘I give my consent.’ असे होते.

नार्को टेस्ट कधी आणि कशी होणार?

सूत्रानुसार आफताबची पुढील आठवड्यात नार्को चाचणी होऊ शकते. ही चाचणी करण्यासाठी 1 ते 2 दिवस लागतील. आंबेडकर रुग्णालयात ही चाचणी होणार आहे. रुग्णालयातील 4 ते 5 लोक आणि FSL टीम चाचणीत सहभागी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

सहसा त्यात काही लिखित प्रश्न असतात जे आधीच अंतिम केले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात 45 ते 50 प्रश्नांचा समावेश असेल. रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असल्याने ही चाचणी रुग्णालयात केली जाते. चाचणीच्या वेळी वैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास रुग्णालयात आयसीयूमध्ये उपस्थित राहून आरोपीला वेळेवर उपचार मिळू शकतात.

आफताबचा मुक्काम पोलिस कोठडीतच

आफताबशी संबंधित प्रकरणाची शुक्रवारी साकेत न्यायालयात सुनावणी झाली. आधी आफताबला न्यायालयात हजर केले जाणार होते, मात्र त्यानंतर न्यायालयातच गदारोळ झाला. तिथे वकिलांनी आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुरू केली. यानंतर आफताबची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करण्यात आली. कोर्टाने आफताबच्या पोलिस कोठडीत पाचदिवसांची वाढ केली होती.

 

आफताबला उत्तराखंडला नेणार

रिमांडदरम्यान पोलीस थर्ड डिग्रीचा वापर करणार नसले तरी अन्य मार्गाने खुनामागील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे. यामध्ये नार्को चाचणीचाही समावेश आहे. यासोबतच पोलीस आफताबला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला घेऊन जाणार आहेत. श्रद्धा आणि आफताब इकडे गेले. पोलीस ऋषिकेशच्या विशिष्ठ गुहेतही जाऊ शकतात. श्रद्धा वलकर तिच्या हत्येच्या 15 दिवस आधी शेवटची इंस्टाग्राम रील पोस्ट केली होती. त्यात वशिष्ठ लेणीचा उल्लेख होता.

मीडिया रिपोर्टनुसार आफताबला आधी ऋषिकेशमध्येच श्रद्धाला मारायचे होते. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने त्याने कट पुढे ढकलला. अद्यापपर्यंत पोलिसांना श्रद्धाचे शीर आणि शस्त्र सापडलेले नाही. आफताबने मृतदेहाचे काही तुकडे, शीर व शस्त्र ऋषिकेशमध्ये फेकले का, याचाही तपास पोलीस या माध्यमातून करणार आहेत.