मोठी बातमी! आता थेट जपानवर मिसाईल हल्ला, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश, युद्धाचा भडका उडणार?

मोठी बातमी समोर येत आहे, व्हेनेझुएलावर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर काही तासांमध्ये जपानच्या दिशेनं मिसाईल डागण्यात आले आहेत, यामुळे मोठी खळबळ उडाली असून, सैन्य अलर्ट मोडवर आहे.

मोठी बातमी! आता थेट जपानवर मिसाईल हल्ला, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश, युद्धाचा भडका उडणार?
जपानच्या दिशेनं डागले मिसाईल
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 04, 2026 | 8:58 PM

अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला करून व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे, अमेरिकेच्या या कारवाईवर अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर काही तासांच्या आतच उत्तर कोरियानं मोठं पाऊल उचललं आहे. उत्तर कोरियानं आता थेट जपानच्या दिशेनं मिसाईल डागले आहेत. या घटनेमुळे आता तणाव आणखी वाढला आहे. उत्तर कोरियानं रविवारी पहाटे आपल्या पूर्व किनारपट्टीवरून जपानच्या समुद्रात बॅलिस्टिक क्षेत्रणास्त्र हल्ला केला आहे. या अनपेक्षित घटनेमुळे आता दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये खळबळ उडाली असून, आणिबाणीचा इशारा देण्यात आला आहे, दोन्ही देशांचे सैन्य अलर्ट मोडवर आहेत. विशेष म्हणजे दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती हे चीनच्या दौऱ्यावर जाण्याच्या काही तास आधीच उत्तर कोरियानं ही कारवाई केली आहे.

दरम्यान उत्तर कोरियाच्या मिसाईल हल्ल्यामध्ये जपानचं कोणतंही नुकसान झालं नाही, ही सर्व मिसाईल जपानच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन EEZ च्या बाहेर समुद्रात पडली आहेत, याबद्दल जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी यांनी माहिती दिली आहे. दरम्यान अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे जपानमध्ये एकच धावपळ उडाली होती, तेथील सरकारने काही काळासाठी आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश दिले होते. या हल्ल्यानंतर आता जपानंच सैन्य अलर्ट मोडवर आहे. जापनकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला असून, हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा भंग करण्याचा प्रकार असल्याचं जपानने म्हटलं आहे.

मिसाईल का डागले?

तज्ज्ञांच्या मते अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर हे उत्तर कोरियानं केलेलं शक्तिप्रदर्शन आहे. जर कोणतंही परकीय आक्रमण झालं तर त्यासाठी देश तयार आहे, असा संदेश यातून कीम उन जोंग यांना द्यायचा आहे. दरम्यान दुसरीकडे चिंता वाढवणारी आणखी एक बाब म्हणजे किम जोंग उन यांनी मिसाईलचं उत्पादन दुप्पट करण्याचे आदेश आपल्या प्रशासनाला दिले आहेत.