आता 1 रुपयात मिळणार संपूर्ण 24 दिवस मोफत कॉलिंग अन् डेटा, या कंपनीच्या ऑफरने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ, ग्राहकांना बंपर लॉटरी

सध्या टेलिकॉम क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे आपल्या कंपनीला जास्तीत जास्त ग्राहक कसे मिळतील यासाठी टेलिकॉम कंपन्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच या कंपनीकडून ग्राहकांना थेट 1 रुपयांमध्ये पूर्णपणे फ्री डेटा, कॉलिंग अन् एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आता 1 रुपयात मिळणार संपूर्ण 24 दिवस मोफत कॉलिंग अन् डेटा, या कंपनीच्या ऑफरने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ, ग्राहकांना बंपर लॉटरी
सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 3:08 PM

भारतामध्ये सध्या स्थितीत अनेक टेलिकॉम कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे या कंपन्यांमध्ये एक प्रकारची स्पर्धा सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आपले ग्राहक जास्तीत जास्त कसे वाढतील? याकडे या कंपन्या सध्या आपलं लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. आपल्या कंपनीचीच सेवा ग्राहकांनी वापरावी? यासाठी विविध कंपन्यांकडून ग्राहकांना खास आकर्षक ऑफर देखील देण्यात येत आहेत. कंपन्यांमधील या स्पर्धेचा ग्राहकांना फायदा मिळताना दिसत आहे. काही कंपन्यांकडून ग्राहकांना अत्यंत स्वस्त दरात कॉल, एस एमएस आणि डेटा प्लॅन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जर तुम्ही एखाद्या कंपनीकडून वर्षभराचा रिचार्ज प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला त्यावर आणखी चांगली सूट मिळते. सुरुवातीला जेव्हा जीओ लाँच झालं, त्यानंतर भारतात इंटरनेटचे दर हे झपाट्याने कमी झाल्याचं पहायला मिळालं. इतर कंपन्यांना देखील या स्पर्धेत सहभागी व्हावं लागलं.

दरम्यान आता या स्पर्धेला सरकारी कंपनी असलेली बीएसएनएल देखील अपवाद राहिलेली नाहीये. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक खास प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त एक रुपयाच्या रिचार्जमध्ये 24 दिवस अगदी मोफत कॉलिंग सुविधा, डेली एक जीबी डेटा आणि प्रति दिवस शंभर एसएमएसची सुविधा मिळणार आहे. बीएसएनएलचा हा प्लॅन ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून, अनेकजण बीएसएनएलच्या याच प्लॅनची निवड करताना दिसत आहेत. या प्लॅनमुळे बीएसएनएलचा ग्राहक वाढला असल्याचं समोर आलं आहे. हा प्लॅन लोकप्रिय ठरला असल्यामुळे या प्लॅनला कंपनीने मुदतवाढ देखील दिली आहे. मात्र त्याचसोबत काही अटी देखील घातल्या आहेत.

Loading...

बीएसएनएलचा हा प्लॅन फक्त नव्या ग्राहाकांसाठीच असणार आहे, जुन्या ग्राहकांसाठी हा प्लॅन लागू नसेल. जे ग्राहक नव्याने सीम खरेदी करतील त्यांच्यासाठीच हा प्लॅन लागू असेल. ग्राहकांना एका सीमवर एकदाच या प्लॅनचा फायदा मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर सीम खरेदी केलं, त्यानंतर 24 दिवस तुम्हाला एक रुपयाच्या रिचार्जमध्ये सर्व सुविधा अगदी मोफत मिळणार आहेत. परंतु त्यानंतर तुम्हाला कंपनीने ठरवून दिलेलं शुल्क भरून या सुविधा सुरू ठेवाव्या लागतील. मात्र जरी असं असलं तरी देखील बीएसएनएल ही सरकारी कंपनी सध्याच्या काळात सर्वात कमी दरामध्ये कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सुविधा देणारी कंपनी आहे. ग्राहक या प्लॅनचा फायदा घेऊ शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us