गणेश विसर्जन मिरवणूकीत विद्यार्थीनीचा मृत्यू, डीजेच्या आवाजाने मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

Student Death Loud DJ Sound: एकीकडे ध्वनी प्रदुषण आणि डीजे साऊंड सिस्टीमवरुन वातावरण तप्त असताना एका विद्यार्थींनीचा डीजेच्या तीव्र आवाजाने मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

गणेश विसर्जन मिरवणूकीत विद्यार्थीनीचा मृत्यू, डीजेच्या आवाजाने मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
mp case
| Updated on: Sep 26, 2026 | 3:59 PM

Betul News: डीजेच्या ध्वनी प्रदुषणावरुन सर्वत्र चर्चा असताना आता डिजेच्या आवाजाने एका मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. जे.एच. कॉलेजच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीत १७ वर्षांची विद्यार्थीनी प्रतिक्षा वर्मा हीची तब्येत अचानक बिघडली आणि ती बेशुद्ध होऊन जमीनीवर पडली. ही घटना शुक्रवारी रात्री ९ ते १० च्या दरम्यान घडल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी प्रतिक्षा हिला लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषीत केले आहे.

शाहपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुहागपूर ढाणा येथील नितेश वर्मा यांची प्रतिक्षा वर्मा ( १७ ) मुलगी आहे. सध्या ती बैतूलच्या विकास नगरात भाड्याच्या घरात रहाते आणि जे.एच. कॉलेजात B.Sc प्रथम वर्षाला होती. अचानक झालेल्या या घटनेत प्रतिक्षा हिचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने तिच्या कॉलेजच्या मित्रपरिवारा मोठा धक्का बसला आहे.

DJ ध्वनी यंत्रणेवर प्रश्न

घटनेनंतर हॉस्पिटलात पोहचलेल्या नातेवाईकांनी विसर्जन मिरवणूकीत वाजत असलेल्या डीजे साऊंडच्या आवाजावर प्रश्न केला आहे. कुटुंबियांनी डीजेचा असह्य आवाज सहन न झाल्याने प्रतिक्षाच्या हृदयावर परिणाम झाला आणि तिची तब्येत बिघडून तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, डॉक्टर आणि पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टेमचा अहवाल आल्यानंतरच कळेल असे म्हटले आहे.

ध्वनीची पातळीचा तपास

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की पोस्टमार्टेमची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द केला जाईल असे म्हटले आहे. यासोबत मिरवणूकीत वापरलेल्या डीजे साऊंड सिस्टीम आणि त्याच्या ध्वनीची पातळीचा तपास केला जात आहे. ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले तर आयोजकांवर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने म्हटले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us