पंतप्रधान मोदींवर जादू टोणा? थेट स्मशानभूमीत आढळला फोटो…, चार नारळ, दोन लिंबू अन्…, नेमकं काय काय सापडलं?

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो थेट स्मशानभूमीत आढळून आला आहे. फोटोसोबतच नारळ, लिंबू आणि अजूनही काही वस्तू आढळून आल्या आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान मोदींवर जादू टोणा? थेट स्मशानभूमीत आढळला फोटो..., चार नारळ, दोन लिंबू अन्..., नेमकं काय काय सापडलं?
पंतप्रधान मोदींवर जादू टोण्याचा संशय
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 6:35 PM

उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातल्या दोहरीघाट स्मशानभूमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सापडला आहे. ज्या स्थितीमध्ये हा फोटो आढळून आला आहे, ते पाहून राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसमोर नारळ, लिंबू, लाल धागा, आणि कुंकू ठेवण्यात आल्याचं आढळून आलं आहे. मोदी यांच्या फोटोसमोर जे लिंबू ठेवण्यात आलं आहे, त्या लिंबाला टाचण्या देखील टोचण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकाराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या व्हायरल व्हिडीओची कोणतीही पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाहीये. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होताच आता या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून, तपासाला सुरुवात केली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना दोहरीघाट परिसरात असलेल्या एका स्मशानभूमीमध्ये घडली आहे. ही स्मशानभूमी शरयू नदीच्या किनाऱ्यावर आहे. या स्मशानभूमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो आढळून आला आहे. ज्या फोटोसमोर लिंबू, कुंकू, तसेच काही टाचण्या देखील ठेवण्यात आल्याचं आढळून आलं आहे. एवढंच नाही तर त्या लिंबाला टाचण्या देखील टोचण्यात आल्या आहेत. ज्या पद्धतीने हे साहित्य ठेवण्यात आलं आहे, त्यावरून या घटनेचा संबंध हा टोना -टोटकाशी जोडला जात आहे. मात्र या सर्व गोष्टी कोणी केल्या, त्यामागचा त्याचा नेमका काय उद्देश होता? हे अजूनही स्पष्ट होऊन शकलेलं नाहीये.

Loading...

व्हिडीओ व्हायरल

दरम्यान या सर्व प्रकरणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मोदींच्या फोटो समोर काय -काय ठेवण्यात आलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो स्मशानभूमीत ठेवण्यात आला आहे, या फोटोच्या चारही कोपऱ्यावर एक -एक नारळ ठेवण्यात आलं आहे. या नारळाला लाल धाग्याने बांधण्यात आले आहे. तसेच दोन लिंब देखील ठेवण्यात आले आहेत. या लिंबांना टाचण्या टोचण्यात आल्या आहेत. तसेच या फोटोवर कुंकू उधळण्यात आलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us