दिल्लीतील आंदोलनापूर्वी सीजेपीच्या नेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, 100 किलोमीटर फिरवलं अन्….
सीजेपीने राजस्थान पोलिसांवर अलवरमध्ये आपले सहकारी दीपक बलियान यांना ताब्यात घेणे आणि त्यांच्याशी मारहाण आणि वाईट वागल्याचा आरोप केला आहे.

सीजेपीने राजस्थान पोलिसांवर आरोप केला आहे की पोलिसांनी त्यांच्या पक्षाचे संघटनात्मक सह प्रभारी दीपक बलियान यांना गुरुवारी रात्री अलवर जिल्ह्यातून त्यांच्या निवासस्थानातून जबरदस्ती ताब्यात घेतले. आणि त्यांच्या पायात फॅक्चर असूनही त्यांच्यासोबत पोलिस वाईट वागल्याचा आरोप केला त्यांनी केला आहे.
सीजेपी पार्टीचे सह-संयोजक आशुतोष रांका यांनी सांगितले की पोलिसांनी बालियान याना ८ ऑक्टोबर रोजी कमठूर स्थित त्यांच्या घरातून घेऊन गेले आणि उशीरा सोडून दिले. बलियान यांनी शुक्रवारी राजस्थान पोलिसांवर गेल्या रात्री अलवर जिल्ह्यातील त्यांच्या घरातून जबदस्ती उचलून नेल्याचा आरोप केला आहे.
नजरबंदही केले
कठमूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेले मनखेडा गावचे निवासी बलियान यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की पोलिसांनी त्यांना जबरस्ती घेऊन जाण्याआधी त्यांच्या घरात नजरबंद केले होते. बलियान यांनी आरोप केला आहे की पोलिसांनी त्यांचा मोबाईल फोन आणि चप्पल देखील जप्त केली आणि त्यांच्याकडून जबरदस्त हस्तांक्षरात लिहून घेतले की त्यांच्या सोबत कोणतीही मारहाणा झाली नाही. बालियान यांनी इशारा देत सांगितले की जर पोलिस अशाच प्रकारचे कारवाई जारी ठेवत असेल तर कठमूरू पुढील जंतर मंतर बनेल.
पोलिसांनी आरोप फेटाळला
कठमूरचे पोलिस अधिकारी चंद्रशेखर शर्मा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निर्देशानंतर एक टीम बलियान यांना सांगण्यासाठी त्यांच्या घरी गेली आणि
सांगितले की दिल्लीत BNS कलम 163 लागू आहे आणि त्यांना या संदर्भात समजवण्यात आले.
पोलिस अधिकारी चंद्रशेखर शर्मा यांनी सांगितले की त्यांना नंतर सोडण्यात आले आणि त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे. शर्मा यांनी बलियान यांचा फोन जप्त करण्याचा आरोप फेटाळला आहे.
बलियानच्या कुटुंबीयांनी घटनेचा तपशील दिला
बलियानच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पोलीस त्यांच्या घरी आले आणि त्यांना सांगितले की स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने त्यांना बोलावले आहे. बलियान यांनी पोलिसांच्या कारवाईचे सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण (लाइव्ह-स्ट्रीम) केले.
कुटुंबीयांचा दावा आहे की, पोलिसांचे पथक निघून गेले, पण थोड्याच वेळात परत आले आणि त्यांनी बलियानला तो व्हिडिओ हटवण्यास सांगितले. कुटुंबीयांचा आरोप आहे की, जेव्हा बलियानने व्हिडिओ हटवण्यास नकार दिला, तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
‘पोलीस गुंडांसारखे वागले’
रांका यांनी आरोप केला की, बलियानचा पाय मोडलेला होता, तरीही पोलिसांनी त्याला फरफटत नेले, ज्यामुळे त्याला आणखी दुखापत झाली.
रांका यांनी ‘एक्स’ (X) या सोशल साईटवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, बलियानला घरी सोडण्यापूर्वी सुमारे १०० किलोमीटरचा प्रवास घडवून आणण्यात आला. रांका यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, पोलिसांना त्यांच्या मर्यादांची जाणीव आहे, ही चांगली गोष्ट आहे.
यापूर्वीच्या एका पोस्टमध्ये, रांका यांनी बलियान आणि त्याच्या भावाला दिलेल्या कथित वागणुकीवरून राजस्थान पोलीस गुंडांसारखे वागल्याचा आरोप केला होता.