Presidential Election 2022: विरोधकांसाठी खुशखबर, तेलंगणांच्या केसीआरचा यशवंत सिन्हांना पाठिंबा, राष्ट्रपती निवडणुकीतली मोठी घडामोड

| Updated on: Jun 27, 2022 | 2:07 PM

विरोधी पक्षांसाठी दिलासादायक बातमी आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेख राव यांनी विरोधीपक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यशवंत सिन्हा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Presidential Election 2022: विरोधकांसाठी खुशखबर, तेलंगणांच्या केसीआरचा यशवंत सिन्हांना पाठिंबा, राष्ट्रपती निवडणुकीतली मोठी घडामोड
Follow us on

नवी दिल्ली : विरोधी पक्षांसाठी दिलासादायक बातमी आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेख राव (K. Chandrashekh Rao) यांनी विरोधीपक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. केसीआर यांचे पुत्र राज्यमंत्री केटी रामाराव (K. T. Rama Rao) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. राज्यमंत्री केटी रामाराव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांना आमचा देखील पाठिंबा आहे. यशवंत सिन्हा हे सोमवारी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी पक्षाच्या वतीने मी दिल्लीमध्ये उपस्थित राहणार आहे. दरम्यान यशवंत सिन्हा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांची उपस्थिती होती. यशवंत सिन्हा यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, सपा, यांच्यासह जवळपास सर्वच विरोधी पक्षाने पाठिंबा दिला आहे.

भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना उमदेवारी

दरम्यान दुसरीकडे भाजपाच्या वतीने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी गेल्याच आठवड्यात आपला अर्ज दाखल केला आहे. यावेळी द्रौपदी मुर्मू यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती होती. तर आज विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, सपा, यांच्यासह जवळपास सर्वच विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार, ममता बॅनर्जी आणि इतर काही प्रमुख विरोधी पक्षांची राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली होती. या चर्चेनंतर यशवंत सिन्हा यांचे नाव फायनल करण्यात आले. संख्याबळाचा विचार करता सध्या तरी भाजपाचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

 

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाचीही चर्चा

दरम्यान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असावा? यावरून विरोधी पक्षांत मतभेद होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देखील काही काळ राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून चर्चेत होते. काही विरोधी पक्षांनी त्यांच्या नावाचा पर्याय सूचवला होता. मात्र शरद पवार यांनी आपण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला उभे राहणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्यानंतर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आले. आज यशवंत सिन्हा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.