AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajasthan : राजस्थानमध्येही महाराष्ट्र संकट? गहलोतच्या निशाण्यावर सचिन पायलट, काय काय घडतंय?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्या संयमाचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री गहलोत यांनी 2020 च्या बंडाची आठवण करुण दिली आहे. त्यांच्या या विधानानंतर नगरविकास मंत्री शांती धारीवाल यांनीही याला दुजोरा दिला आहे. सरकार पाडण्याच्या कटात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि सचिन पायलट यांच्यात भेट झाली होती.

Rajasthan : राजस्थानमध्येही महाराष्ट्र संकट? गहलोतच्या निशाण्यावर सचिन पायलट, काय काय घडतंय?
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट
| Updated on: Jun 27, 2022 | 11:56 AM
Share

मुंबई :  (Maharashtra Politics) महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होत असली तरी येथील राजकीय ड्रामाचे अनुकरण इतर राज्यातही केले जाणार का अशी परस्थिती निर्माण झाली आहे. (Rajshtan Politics) राजस्थानामध्ये सत्तेत असलेल्या कॉंग्रेसमध्येही दोन गट आहेत हे आता काही लपून राहिलेले नाही. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्या संयमाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री पदी अशोक गहलोत असताना राहुल गांधी यांनी केलेल्या कौतुकामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Sachin Pilot) सचिन पायलट यांचे कौतुक होताच मुख्यमंत्री गहलोत यांनी 2020 च्या राजकीय बंडाची आठवण करुन दिली आहे. असे असताना सचिन पायलट यांच्या गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. सचिन पायलट यांचा एक स्वतंत्र गट तर आहेच पण तरुणांमध्ये त्यांच्याविषयी आकर्षण आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टोल्यानंतरही कोणतीही प्रतिक्रिया न देणे म्हणजे ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राजस्थानमध्येही महाराष्ट्राप्रमाणे राजकीय संकट येणार का हा खरा प्रश्न कायम आहे.

काय आहे पार्श्वभूमी?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्या संयमाचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री गहलोत यांनी 2020 च्या बंडाची आठवण करुण दिली आहे. त्यांच्या या विधानानंतर नगरविकास मंत्री शांती धारीवाल यांनीही याला दुजोरा दिला आहे. सरकार पाडण्याच्या कटात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि सचिन पायलट यांच्यात भेट झाली होती. त्यामुळे अशोक गहलोत यांनी रविवारी केलेल्या विधानात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. सरकार पाडण्यात या दोघांचाच हात असल्याचे धारीवाल यांनी सांगितले आहे. असे असले तरी सचिन पायलट यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

राहुल गांधींनी केले होते पायलट यांचे कौतुक

सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. चौकशीच्या दरम्यान राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्या संयमाचे कौतुक केले होते. त्याचे झाले असे चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना विचारले की, तुम्हा थकलेलो नाहीत का ? तेव्हा राहुल गांधी म्हणाले कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये संयम आहे. त्याचवेळी त्यांनी समोर असलेले सचिन पायलट यांचे नाव घेतले. तेव्हा पायलट यांच्या समर्थकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तेच निमित्त ठरले ते अंतर्गत वादाला. राहुल गांधी यांच्या भूमिकेनंतर गेहलोत यांच्याकडून बोचरी टिका करण्यास सुरवात झाली आहे.

गहलोत यांनी दिली बंडाची आठवण करुन

राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांचे कौतुक केल्यानंतर कॉंग्रेसचे अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. यानंतर गहलोत यांनी थेट 2020 राजकीय बंडाची आठवण करुन दिली आहे. एवढेच नाहीतर राजकीय कटकारस्थानामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि सचिन पायलट हे सहभागी असल्याची आठवणही करुन देण्यात आली आहे. 2018 नंतर राजस्थानमध्ये सरकार स्थापन झाल्यापासून गेहलोत पायलट यांचा पक्षातील दोन सत्ताकेंद्रांशी असलेला संघर्ष वारंवार समोर येत आहे. त्यामुळे नाराज गटाने जर महाराष्ट्रातील बंडखोरांप्रमाणे भूमिका घेतली वेगळे वाटायला नको.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.