AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : ईशानची स्फोटक खेळी, टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसमोर मोठा रेकॉर्ड

India Highest Total Against Pakistan In T20i World Cup : भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पाकिस्तान विरुद्ध टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत मोठा विक्रम केला आहे.

IND vs PAK : ईशानची स्फोटक खेळी, टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसमोर मोठा रेकॉर्ड
Ishan Kishan Team IndiaImage Credit source: Bcci x Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 15, 2026 | 9:55 PM
Share

ओपनर इशान किशन याने केलेल्या तोडफोड खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. टीम इंडियासाठी एकूण 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. तर 2 प्रमुख फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी चिवट बॉलिंग करत भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. मात्र तरीही टीम इंडियाने इतिहास घडवला.टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील 175 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. टीम इंडियाने यासह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाने याआधी 2022 साली पाकिस्तान विरुद्ध 6 विकेट्स गमावून 160 धावा केल्या होत्या. अशात आता टीम इंडिया 175 धावांचा यशस्वी बचाव करुन सलग तिसरा विजय मिळवणार की पाकिस्तान विजयासह सुपर 8 मध्ये पोहचणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानने भारताला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. अभिषेक शर्मा पुन्हा झिरोवर आऊट झाला. अभिषेकची या स्पर्धेत झिरोवर आऊट होण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली.

इशानचा तडाखा

अवघ्या 1 धावेवर विकेट गमावल्यानंतर इशान किशन याने तिलक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी धमाका केला. इशानने चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीची हवा काढली. इशानने पाहता पाहता अर्धशतक झळकावलं. इशानने अर्धशतकानंतर फटकेबाजी करत धावांचा वेग कायम ठेवला. मात्र सॅम अय्युब याने इशानला आऊट केलं. इशानने सर्वाधिक 77 धावा केल्या.

त्यानंतर तिलक वर्मा, कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या तिघांनी किल्ला लढवला. या तिघांनी झुंज दिली. मात्र या तिघांपैकी एकालाही फटकेबाजी करुन पाकिस्तानच्या गोलंदाजांवर कुरघोडी करता आली नाही.  हार्दिक पंड्या याला भोपळाही फोडता आला नाही.  तिलकने 25 आणि शिवमने 27  धावा केल्या. तर कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 32 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी रिंकु सिंह याने 4 बॉलमध्ये 1 फोर आणि 1 सिक्ससह निर्णायक आणि नाबाद 11 धावा जोडल्या.  रिंकूने केलेल्या या निर्णायक खेळीमुळे भारताला पाकिस्तानन विरुद्ध टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत मोठी धावसंख्या उभारता आली.

टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील सर्वोच्च धावसंख्या

टीम इंडिया, 175 धावा, 2026

टीम इंडिया, 160 धावा, 2022

पाकिस्तान, 159 धावा, 2022

टीम इंडिया, 157 धावा, 2007

Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी