कितीही खरेदी करा वांधा नाही; या देशात फक्त दीड रुपयांमध्ये मिळतंय एक लिटर पेट्रोल

इस्रायल, अमेरिका इराण युद्धामुळे सध्या संपूर्ण देशांमध्ये भीषण इंधन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र जगाच्या नकाशावर असा देखील एक देशा आहे, जिथे पेट्रल, डिझेलची किंमत ही खूपच कमी आहे.

कितीही खरेदी करा वांधा नाही; या देशात फक्त दीड रुपयांमध्ये मिळतंय एक लिटर पेट्रोल
Petrol rate
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 04, 2026 | 3:45 PM

इराणमध्ये सध्या मोठं युद्ध सुरू आहे. इराण एकाचवेळी अमेरिका आणि इस्रायलसारख्या प्रचंड मोठ्या शत्रूचा सामना करत आहे. आज युद्धाचा पाचवा दिवस आहे. या पाच दिवसांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्रायलला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्रायलचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिकेचा या युद्धात पाण्यासारखा पैसा खर्च झाला आहे. मात्र या युद्धामुळे संपूर्ण जग आता एका मोठ्या संकंटात सापडलं आहे. ते म्हणजे जवळपास सर्वच देशांमध्ये भीषण इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. इंधनाचे भाव दुपटीने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान भारतातील काही शहरांमध्ये तर पेट्रोल, डिझेल महागणार असल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर लोकांनी पेट्रोलपंपांवर प्रचंड गर्दी केल्याचं देखील चित्र पहायला मिळालं. मात्र एक असा ही देश आहे, ज्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल प्रचंड स्वस्त मिळतं. एवढं स्वस्त की किंमत ऐकून तुमचाही त्यावर विश्वास बसणार नाही.

कोणता आहे हा देश?

हा देश दुसरा तिसरा कोणता नसून खुद्द इराण आहे. सध्या इराणमध्ये प्रचंड अशांतता आहे. तिथे भीषण युद्ध सुरू आहे. लोक आपला जीव मुठीत धरून एक एक दिवस पुढे ढकलत आहेत. तर दुसरीकडे इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला असून, मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणमध्ये मात्र पेट्रोल हे खूप स्वस्त मिळत आहे. इराणमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर अवघा 1.50 भारतीय रुपये एवढा आहे. याचाच अर्थ इराणमध्ये दीड रुपयाला एक लिटर पेट्रोल मिळतं. इथे पाण्यापेक्षाही पेट्रोल स्वस्त मिळतं.

पेट्रोलचा दर एवढा कमी असण्याचं कारण काय?

जसं भारत सरकार भारतीय नागरिकांना वेगवेगळ्या वस्तुंवर सबसीडी देते, त्याच पद्धतीने इराणमधील सरकारने तेथील नागरिकांना इंधनावर प्रचंड मोठ्या प्रमाणात सबसीडी दिली आहे. इंधन हे आपल्याच जमिनीवरच प्रोडक्ट असल्यामुळे त्याचा आपल्या नागरिकांना फायदा व्हायला पाहिजे असा इराणी सरकारचा विचार असल्यामुळे तेथील नागरिकांना इंधनावर प्रचंड प्रमाणात सबसिडी दिली जाते, तसेच इराणकडे प्रचंड प्रमाणात कच्च्या तेलाचे साठे आहेत, हे देखील त्यामागचं एक मोठं कारण आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us