मोदी रात्री 8 वाजता आले अन् ‘या’ गोष्टी घडल्या, आज काय बोलणार?

पंतप्रधानांनी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केलं आणि अचानक मोठ्या निर्णयाची घोषणा केली असं अनेकदा घडलं आहे. ते आजही रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

मोदी रात्री 8 वाजता  आले अन् या गोष्टी घडल्या, आज काय बोलणार?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 12, 2025 | 7:24 PM

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. हा इतिहास आहे की, जेव्हा -जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रात्री आठ वाजता देशाला संबोधित करतात तेव्हा ते काहीतरी मोठी घोषणा करत असतात. त्यामुळे आज नरेंद्र मोदी हे काही महत्त्वाची घोषणा करणार का? काही मोठा निर्णय घेणार का? याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. नोटबंदी असो कोरोनाशी संबंधित घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय असो या सर्वांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री आठ वाजताच केलेली आहे.

पंतप्रधानांनी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केलं आणि अचानक मोठ्या निर्णयाची घोषणा केली असं अनेकदा घडलं आहे. ते आजही रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत, त्यांनी आतापर्यंत असे किती निर्णय घेतले आणि काय -काय घोषणा केल्या? त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

25 डिसेंबर 2021: ख्रिसमसच्या दिवशी रात्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली, त्यांनी 15-18 वयोगटातील मुला मुलींसाठी कोराना लसीचा डोस उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.

19 नोव्हेंबर 2021: मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली

22 ऑक्टोबर 2021: भारतानं एक अब्ज लोकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडला तेव्हा त्यांनी देशाला संबोधित केलं होतं.

7 जून 2021: केंद्र सरकारकडून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लसीकरणाची घोषणा

19 मार्च 2020: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा

8 ऑगस्ट 2019: जम्मू काश्मीरमधून अर्टिकल 370 हटवण्यात आलं, त्याच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोंधित केलं.

8 नोव्हेंबर 2016: सर्वात मोठा निर्णय 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी

दरम्यान आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान पहिल्यांदाच देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी काय बोलणार? याबाबत सर्वांच्या मनामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Follow Us