भाजपाच्या राज्यपालांवर गंभीर आरोप, काय आहे अंकिता भंडारी प्रकरण? VIP चा ऑडिओ व्हायरल
काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाली. थेट सिक्कीमच्या भाजपाच्या राज्यपालांवर गंभीर आरोप केले जात आहेत. अंकिता भंडारी प्रकरणात गंभीर आरोप केली जात आहेत. तिचे आई वडील दिल्लीत आंदोलनाला बसले. ज्याला काँग्रेसने पाठिंबा दिला.

दिल्ली पोलिस अलर्ट मोडवर आहेत. सीजेपीचे कार्यकर्ते दिल्लीत आहेत. सीजेपीचे मुख्य दोन नेते जेलमध्ये आहेत. त्यातच उत्तराखंडची मुलगी अंकिता भंडारी हिच्या न्यायासाठी तिच्या पालकांनी दिल्लीतत धरणे आंदोलन केले. राहुल गांधींनी तिच्या पालकांची भेट घेतली. काल रात्री इंडिया गेटजवळ आंदोलन करत असलेल्या अंकिता भंडारीच्या पालकांना आणि काँग्रेसचे काही नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांची सुटका केली. मात्र काँग्रेसचे काही नेते अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. बुधवारी अंकिताच्या पालकांनी इंडिया गेटवर धरणे आंदोलन सुरू केले. काही वेळातच काँग्रेस नेत्यांनी या परिस्थितीचे रूपांतर राजकीय मुद्द्यात केले आणि मोदी सरकार तसेच पोलिसांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
काँग्रेस नेत्यांची ही घोषणाबाजी अनेक तास सुरू राहिली. रात्री उशिरा पोलीस आणि निमलष्करी दलांनी काँग्रेस नेते, पक्षाचे कार्यकर्ते आणि अंकिताच्या पालकांना ताब्यात घेतले. सिक्कीमचे राज्यपाल म्हणून भाजप नेते दुष्यंत कुमार गौतम यांच्या नियुक्तीच्या विरोधात हे आंदोलन आहे. अंकिताच्या प्रकरणात सिक्कीमचे राज्यपाल म्हणून भाजप नेते दुष्यंत कुमार गौतम यांच्यावर आरोप आहेत.
अंकिता भंडारीच्या पालकांनी थेट मागणी आहे की, तिच्या प्रकरणातील कथित व्हीआयपी अँगलबाबत सीबीआय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची नियुक्ती स्थगित ठेवण्यात यावी. अंकिता भंडारी प्रकरणात सतत नाव येत असताना दुष्यंत कुमार गौतम यांची वरणी थेट सिक्कीमचे राज्यपाल म्हणून झाली. त्यानंतर अंकिताचे आई वडील आक्रमक भूमिका घेत आहेत. VIP चा ऑडिओ व्हायरल झाली.
अंकिताच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या मुलीच्या न्यायासाठी देशभरात आंदोलने करू. सर्वात अगोदर दुष्यंत गौतम यांची नियुक्ती रद्द करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. जर ही नियुक्ती रद्द केली गेली नाही, तर त्यांना संपूर्ण देशभर रस्त्यावर उतरावे लागेल. त्यांच्या मुलीला न्याय मिळायलाच हवा, असे कुटुंबियांनी म्हटले. काँग्रेसनेही हा मुद्दा उचलून धरल्याचे बघायला मिळतंय.