मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?

जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जंतर मंतरवर जाऊन अभिजीत दिपके यांची भेट घेतली आहे.

मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?
Sharad Pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 21, 2026 | 4:05 PM

जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जंतर मंतरवर जाऊन अभिजीत दिपके यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी अभिजीत दीपके यांच्याशी संवाद साधला आहे.  ‘सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना डिटेन केलंय एकप्रकारे. आमच्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यावेत. दिल्ली आणि मुंबईतील. प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे. आत्महत्या करण्यात आलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपये द्यावे, सर्व आंदोलकांवरील देशातील एफआयआर मागे घ्या तसेच वांगचुक यांना सोडा. ही आमची मागणी आहे, आमच्या चार प्रमुख मागण्या आहेत, असं यावेळी अभिजीत दिपके यांनी यावेळी शरद पवार यांना म्हटलं.

दरम्यान यावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की,  महाराष्ट्रात ३० महत्त्वाच्या जिल्ह्यात आंदोलन झालं. कोणताही कॉल नसताना हे आंदोलन झालं. तुम्हाला काय मदत पाहिजे, तसेच तुम्ही किती दिवस आंदोलन करणार आहात? असा सवालही यावेळी शरद पवार यांनी दीपके यांना केला. यावर बोलताना दिपके म्हणाले की,  ३१ दिवसांपासून इथे आहे. एक महिना झाला. काल जे झालं त्यामुळे सरकारचा राग आला आहे. आम्ही काय मागत होतो. आम्ही फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होतो, असं दिपके यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियकां गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असल्याची देखील माहिती समोर येत आहे. अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला आता विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने देखील अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मंगळवारी संजय राऊत यांनी जंतरम -मंतरवर जाऊन दिपके यांची भेट घेतली. त्यानंतर आता शरद पवार यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेऊन त्यांच्याशी आंदोलनाबाबत चर्चा केली.

 

 

Follow Us