तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन केले जातंय. या आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. हजारोंच्या घरात तरूण आंदोलनासाठी बसले आहेत. त्यामध्येच या आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..
Jantar Mantar protest video
| Updated on: Jul 22, 2026 | 2:51 PM

नीट परीक्षेच्या पेपरफुटीवर विरोधक आक्रमक झाले. विद्यार्थ्यांकडून दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केले जातंय. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी संसद भवन परिसराकडे मोर्चा नेल्याने आंदोलन चिघळले. त्यानंतर पुन्हा एकदा जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. काल अनेक नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली. यादरम्यान आंदोलनातील विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता आंदोलनातील एक धक्कादायक व्हिडीओ पुढे आल्याने खळबळ उडाली. व्हायरल व्हिडीओनंतर या आंदोलनाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केली जात आहेत. व्हायरल व्हिडीओमधील तरुण हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देताना दिसत आहे. त्या तरुणाने थेट म्हटले की, बांगलादेशासारखे हाल होणार आहेत. हा तर फक्त ट्रेलर आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती आम आदमी पार्टीचा नेता असल्याचा आरोप केला जातोय.

व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण जंतर मंतरवर आक्रमक भाषेत बोलत आहे. तो उपस्थित लोकांसोबत संवाद साधत आहे. तरुणाने म्हटले की, आज आम्ही इथे असेच जमलो नाहीत. आता तर तमाशा सुरू होईल. तुम्हाला आंदोलन दिसत आहे. पण अजून खरा पिक्चर बाकी आहे. या पिक्चरचा तुम्हाला अंदाजा पण नाही. तुम्ही देखील त्या बांगलादेशीसारखे इतर देशात शरण घ्यायला जाणार.

कारण तुम्ही जेवढ्या चोऱ्या केल्या, त्यानुसार शरण घेणेच तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. या देशात आता तुमच्यासाठी काहीच राहिले नाही. हा तरुण थेट बांगलादेशाचा उल्लेख करताना दिसत असल्याने लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बांगलादेशात काही दिवसांपूर्वी लोक रस्त्यावर उतरले. त्यानंतर देश अस्थिर झाला आणि थेट पूर्ण वाट लागली.

या भाषणात तरुणाने बांगलादेशचा उल्लेख केल्याने खळबळ उडाली. या आंदोलनाची दिशा नक्की काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा तरूण आम आदमी पार्टीचा नेता चाैधरी ओवैस आहे. या व्हायरल व्हिडीओने मोठी खळबळ उडाली. थेट या आंदोलनावरच प्रश्न उपस्थित केली जात आहेत.

Follow Us