Shraddha Murder Case: आफताबने एक नाही तर अनेक शस्त्रांनी केले श्रद्धाचे तुकडे, फ्लॅटमध्ये सापडले पाच मोठे चाकू

| Updated on: Nov 24, 2022 | 8:04 PM

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने एकापेक्षा जास्त शस्त्रांचा वापर केला होता.

Shraddha Murder Case: आफताबने एक नाही तर अनेक शस्त्रांनी केले श्रद्धाचे तुकडे, फ्लॅटमध्ये सापडले पाच मोठे चाकू
श्रद्धा वालकर
Image Credit source: Social Media
Follow us on

नवी दिल्ली, संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी (Shraddha Murder Case) एकापाठोपाठ एक अनेक खुलासे होत आहेत. अनेक खुलासे धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे आहेत. या प्रकरणात आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी एकापेक्षा जास्त शस्त्राचा वापर केल्याचे नुकतेच समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्राने सांगितले की,  श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी अनेक शस्त्रे वापरल्याची माहिती आफताबने पोलिसांना दिली आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी 5 मोठे चाकू जप्त केले असून, ते तपासासाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आले आहेत.

हे शस्त्र अतिशय धारदार आहेत आणि त्यांची लांबी सुमारे 5-6 इंच आहे. या चाकूंचा वापर आफताबने श्रद्धाचा मृतदेह कापण्यासाठी केला होता की नाही हे केवळ फॉरेन्सिक टीमच सांगू शकेल. मात्र अजूनही मोठे करवत पोलिसांना सापडलेला नाही.

 

हे सुद्धा वाचा

पॉलिग्राफ चाचणीत आफताब टाळतोय प्रश्नांची उत्तरं

आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीचे दुसरे सत्र रोहिणी येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये (एफएसएल) सुरू आहे. यापूर्वी बुधवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी आफताबला ताप आणि सर्दी असल्याने तपास होऊ शकला नाही. पॉलीग्राफी चाचणीदरम्यान आफताब सहकार्य करत नसल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे. चौकशीदरम्यान तो प्रश्नांची उत्तरे टाळात असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला प्रश्न विचारल्यावर तो पूर्णपणे गप्प राहिला. टेस्टमध्ये तो पूर्ण उत्तरं देत नव्हता.

हा आहे पॉलीग्राफी चाचणीचा उद्देश

 

तपासातील दिरंगाईमुळे आफताबची नार्को टेस्टही लांबणीवर पडली आहे. पॉलीग्राफी चाचणीमध्ये, रक्तदाब, नाडी आणि श्वासोच्छवासाची गती यासारख्या शारीरिक क्रियाकलापांची नोंद केली जाते आणि या डेटाचा वापर व्यक्ती सत्य बोलत आहे की नाही हे शोधण्यासाठी केला जातो. दुसरीकडे, नार्को टेस्टमध्ये व्यक्तीची आत्मभान कमी होते ज्यामुळे तो मोकळेपणाने बोलू शकतो.

प्राथमिक तपासात तो योग्य आढळला नाही तर नार्को ॲनालिसिस करता येणार नाही. आफताबच्या पॉलीग्राफी चाचणीचे पहिले सत्र 22 नोव्हेंबर रोजी एफएसएल, रोहिणी येथे झाले. पॉलीग्राफी चाचणीला लाय डिटेक्टर असेही म्हणतात.