Shraddha Murder Case: ‘सर्वात आधी मी तिचे हात कापले’, नार्को टेस्टमध्ये आफताबने केले अनेक खुलासे

| Updated on: Dec 03, 2022 | 10:22 AM

श्रद्धा वालकर हत्त्या प्रकरणी आरोपी आफताब पुनावाला याची नार्को झाली. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले.

Shraddha Murder Case: सर्वात आधी मी तिचे हात कापले, नार्को टेस्टमध्ये आफताबने केले अनेक खुलासे
श्रद्धा हत्त्याकांड
Image Credit source: Social Media
Follow us on

नवी दिल्ली, श्रद्धा वालकर हत्त्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case) अटकेत असलेला आरोपी आफताब पुनावाला याची नार्को टेस्ट (Aftab Narco Test Result) करण्यात आली.  लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याचा आरोप असलेल्या आफताब पूनावाला याने नार्को चाचणीत अनेक रहस्य उघड केले आहे. नार्को टेस्टमध्ये आफताब पूनावालाने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली तर दिलीच, पण त्याने आधी श्रद्धाचे हात कापल्याचेही सांगितले. त्यासाठी त्याने चिनी शस्त्रे वापरली.

‘ही’ रहस्ये झाली उघड

सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने नार्को टेस्टमध्ये सांगितले की, त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर आधी तिचे हात कापले. यासाठी त्याने चायनीज शस्त्राचा वापर केला आणि या शस्त्राने त्याने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे केले. हत्येनंतर आफताबने श्रद्धा वालकरचा मोबाईल फोन अनेक महिने आपल्याजवळ ठेवल्याचेही सूत्रांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावले तेव्हाही श्रद्धाचा मोबाईल फोन तिच्याकडेच होता, नंतर त्याने श्रद्धाचा मोबाईल मुंबईच्या समुद्रात फेकून दिला.

दोन तास चालली प्रक्रिया

आफताबची पोस्ट नार्को टेस्ट काल शुक्रवारी दोन तास चालली.  फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे (FSL)  चार सदस्यीय पथक आणि तपास अधिकारी नार्को टेस्टनंतर पोस्ट नार्को टेस्टसाठी नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात पोहोचले. मध्यवर्ती कारागृह क्रमांक 4 मध्ये सकाळी 10 वाजता चौकशी सुरू होऊन दुपारी 3 वाजेपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती, मात्र त्याला उशीर झाला. सकाळी 11.30 वाजता टीम तुरुंगात पोहोचली आणि सुमारे 1 तास 40 मिनिटे हे सत्र चालले.

हे सुद्धा वाचा

कशी असते नार्को टेस्ट

नार्को चाचणीमध्ये सोडियम पेंटोथल, स्कोपोलामाइन आणि सोडियम एमायटल यांसारखी औषधे दिली जातात, जी व्यक्तीला भूल देण्याच्या परिणामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर घेऊन जातात. संमोहन अवस्थेत, व्यक्ती पूर्णपणे जागरूक नसते आणि अशी माहिती देण्याची अधिक शक्यता असते, जी तो सहसा जागरूक असताना सांगत नाही. जेव्हा आरोपी गुन्ह्याच्या संबंधित महत्त्वाची माहिती लपवीत असतात आणि तपासाठी अधिक माहितीची गरज असते तेव्हा न्यायालयाच्या परवानगीने तपास यंत्रणा नार्को टेस्ट करते.