राहुल गांधी आणि अखिलेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले… ठिय्या आंदोलनाविरोधात पोलिस एक्शन मोडवर

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पंतप्रधान निवासाबाहेर विरोधी पक्षाने ठिय्या आंदोलन सुरु केले होते. तीन तास हे आंदोलन सुरु होते. अखेर राहुल गांधी, अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

राहुल गांधी आणि अखिलेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले... ठिय्या आंदोलनाविरोधात पोलिस एक्शन मोडवर
rahul gandhi detained
| Updated on: Jul 21, 2026 | 8:04 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात दिल्लीत झालेल्या लाठीमार प्रकरणात शिक्षणमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. साडे तीन तास विरोधकांना पंतप्रधानाच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरु केले आहे. आता सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पोलिसांना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज संसदेत सत्ताधाऱ्यांना दिल्ली लाठीमार प्रकरणात भंडावून सोडले. त्यानंतर दुपारी थेट पायी चालत राहुल गांधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत पंतप्रधान निवासस्थानाजवळ पोहचले.येथे तीन तासांहून अधिक वेळ राहुल गांधी यांनी ठिय्या केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहर यांनी देखील या प्रकरणात राजीनामा द्यावा अशी मागणी केली. हे सरकार परीक्षा देखील नीट घेऊ शकत नाही. अनेक मुलांचे आयुष्य परीक्षेतील घोटाळ्यांनी वाया गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुले नसल्याने त्यांना याची तीव्रता जाणवत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

जितेंद्र सिंह यांची भेट

दोन तासांच्या अंतराने मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. त्यानंतरही विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधकांनी या प्रकरणात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना राजीनामा देणे गरजेचे आहे, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली. तीन तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर अखेर दिल्ली पोलिसांनी आधी काँग्रेसचे खासदारांना ताब्यात घेतले. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलीस व्हॅनमध्ये भरुन नेण्यात आले. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us