सोनम वांगचुक यांचा औषध घेण्यास नकार, डॉक्टरांनी हेल्थ बुलेटीन जाहीर केले
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेले २१ दिवस उपोषण केले होते. आज त्यांना दिल्लीच्या जंतरमंतर येथे पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केले आहे.

पर्यावरणवादी नेते आणि संशोधक सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात उपोषण सुरु केल्यानंतर आज २१ व्या दिवशी त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केले आहे. सोनम वांगचुक यांनी आता रुग्णालयात औषध घेण्यास नकार दिला आहे. सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे हेल्थ बुलेटीन जारी केले आहे.
सोनम वांगचूक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गेली २१ दिवस जंतरमंतरवर उपोषण केले होते. त्यांचे वजन प्रचंड घटल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे अशी मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून होत होती. सोनम वांगचुक यांनी २० जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. आपण आणखी काही दिवस अन्नावाचून राहू शकतो असे त्यांनी म्हटले होते. मात्र, आज शनिवारी दिली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने आंदोलन स्थळावरुन उचलून त्यांची रवानगी दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात केली. त्यांना उचलून अँब्यूलन्समधून थेट रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर घटनास्थळी प्रचंड गदारोळ झाला.
मेडिकल बुलेटीन जारी –
रुग्णालयात दाखल करताना वागंचुक शुद्धीवर होते. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी घटली असल्याने त्यांना डीहायड्रेशनची लक्षणे आढळली आहेत. त्यांची रक्ताची चाचणी घेण्यात आली तेव्हा त्यांच्या रक्तात पोटॅशियमचे प्रमाण घटल्याचेही निदान झाले आहे. नाडी, रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी देखील स्थिर होती अशी माहिती डॉक्टरांनी मेडीकल बुलेटिनमध्ये जाहीर केली आहे. सोनम वांगचुक यांनी IV फ्लुईड्स, ओआरएस आणि औषधे घेण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर
सोनम वांगचुक सकाळी ७.४० वाजताच्या सुमारास आमच्या रुग्णालयात दाखल झाले. ते थोडे अशक्त आहेत आणि दीर्घकाळच्या उपवासामुळे त्यांना सौम्य डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. याशिवाय इतर सर्व महत्त्वाचे पॅरामीटर्स स्थिर आहेत. त्यांच्याप्रकृतीवर नियमितपणे देखरेख आणि तपासणी केली जात आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून ते पूर्णपणे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुरुवातीला त्यांना आपत्कालीन वैद्यकीय विभागात दाखल केले होते. तेथे त्यांची तपासणी झाली. आता त्यांना वैद्यकीय विभागात दाखल केले आहे. डिहायड्रेशनमुळे त्यांच्या इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळीवर परिणाम होत असल्याची चिन्हे दिसत असल्याचेही सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चारू बांबा यांनी सांगितले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना चांगल्या दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात यावे अशी मागणी त्यांची पत्नी गितांजली अंगमो ( Gitanjali Angmo ) यांनी रुग्णालयाच्या अधिक्षकांना केली आहे.