कतारमधून आठ कोटी रुपये लुटले अन् लढवली भाजपकडून निवडणूक, नेत्याने थेट…, मोठी बातमी समोर

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिघे जण कतारला गेले होते. तिथे तब्बल आठ कोटी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारण्यात आला. विशेष म्हणजे त्यानंतर भारतात येऊन यातील एकाने भाजपकडून निवडणूक देखील लढवली

कतारमधून आठ कोटी रुपये लुटले अन् लढवली भाजपकडून निवडणूक, नेत्याने थेट..., मोठी बातमी समोर
आठ कोटी रुपयांच्या रकमेवर डल्ला
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 23, 2026 | 10:08 PM

केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप नेत्याने कतारमध्ये झालेल्या 8 कोटी रुपयांच्या लूट प्रकरणात पोलिसांसमोर सरेंडर केलं आहे. गेल्या वर्षी सात सप्टेंबर रोजी चार जण केरळमधून कतारला गेले होते. कतारमध्ये इंडियन यूनियन मुस्लिम लीगशी (IUML) संबंधित केरळ मुस्लिम कल्चरल सेंटरच्या ऑफिसमध्ये ठेवण्यात आलेल्या पैशांची लूट करून ते पुन्हा भारतात परत आले, असा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणात जवळपास एक वर्ष कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र आता भाजप नेते परप्पिल बालकृष्णन यांनी या प्रकरणात पोलिसांसमोर सरेंडर केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. बालकृष्णन यांनी बुधवारी केरळच्या कोइलांडी पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर केलं आहे. बालकृष्णन हे व्यावसायाने वेल्डर आहेत. त्यांनी गेल्या वर्षी भाजपच्या तिकिटावर कोइलांडी नगर पालिकेची निवडणूक देखील लढवली होती.

दरम्यान बालकृष्णन यांनी आपल्या अटकेपूर्वी एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, ते अन्य तीन लोकांसोबत कतारला गेले होते. तिथे तुम्हाला नोकरी देतो असं त्यांनी मला सांगितलं होतं. सुरुवातीला मला या लुटीच्या प्लॅनबद्दल काहीच माहिती नव्हती. कतारच्या दोहा शहरात पोहचल्यानंतर मला शाजी बॉम्बे उर्फ शाजहान आणि बावा यांनी मला तिथ एका लॉजवर नेलं. तिथून त्यांनी मला कुठेही जाऊ दिलं नाही. त्यानंतर मला कतारच्या तुमामामध्ये असलेल्या केरळ मुस्लिम कल्चरल सेंटरच्या ऑफिसमध्ये एका कारमधून नेण्यात आलं, त्यानंतर मला धमकी देऊन लॉकर तोडायला सांगितलं. त्यानंतर त्यांनी या सर्व रकमेवर डल्ला मारला. कमरू नावाची व्यक्ती या लोकांना सूचना देत होती, असा दावा या व्हिडीओमध्ये बालकृष्णन यांनी केला आहे.

Loading...

दरम्यान या प्रकरणात आता आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा बालकृष्णन यांनी केला आहे, तसेच मला जामिनावर देखील सोडू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी राशी, सलीह,बॉम्बे शाजी, कमरुद्दीन आणि हसन यांना देखील आरोपी केलं आहे. बालकृष्णन यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर बाकीचे सर्व आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us