असं गाव महिला खूपच सुंदर पण आयुष्यात एकदाच अंघोळ करतात, लग्नानंतरही परपुरुषांबरोबर सेक्सची परवानगी, हनीमूनच्या दिवशीच…

असं देखील एक गाव आहे, जिथे महिला आपल्या आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात. हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. या महिला आजही आपल्या पूर्वजांकडून चालत आलेल्या प्रथा परंपरांचं पालन करतात.

असं गाव महिला खूपच सुंदर पण आयुष्यात एकदाच अंघोळ करतात, लग्नानंतरही परपुरुषांबरोबर सेक्सची परवानगी, हनीमूनच्या दिवशीच...
women
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 06, 2026 | 9:07 PM

प्रत्येक गावाच्या प्रथा परंपरा या वेगळ्या असतात. भारतामध्ये अनेक राज्य आहेत, राज्य बदलले की प्रथा परंपरा देखील बदलतात. काही राज्यांमध्ये एखादा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तर काही राज्यांमध्ये तो सण साजरा केला जात नाही. तसेच काही प्रथा या विशिष्ट समाजामध्ये पाळल्या जातात, तर त्याच प्रथा दुसर्‍या समाजात निषिद्ध मानल्या जातात. काही प्रथा परंपरा या कालबाह्य झालेल्या असतात, मात्र तरी देखील त्या प्रथा परंपरा त्या -त्या समाजात पाळल्या जातात. अशा प्रथा परंपरांचे काही फायदे देखील आहेत, तर काही तोटे देखील आहेत. काही प्रथा परंपरा तर अशा आहेत, त्या प्रथांमुळे ते अख्खं गाव प्रसिद्ध होतं. आदिवासी समाजामध्ये देखील अशा अनेक प्रथा आहेत, ज्या आजही हा समाज पाळत आलेला आहे. आज आपण अशा एका प्रथेची माहिती घेणार आहोत, जी प्रथा आजच्या काळात कालबाह्य झालेली आहे, परंतु तरी देखील या प्रथेचं पालन येथील महिला करताना दिसतात.

आज आपण अशा एका प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु तरी देखील या महिला अजूनही या प्रथेचं पालन करतात. या महिला त्यांच्या आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात. त्यानंतर त्या कधीही अंघोळ करत नाहीत. या जातीमधील महिला या खूप सुंदर असतात, त्यांच्या सुंदरतेची चर्चा संपूर्ण जगभर होते, परंतु त्या आपल्या आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात. तसेच या महिलांना त्यांच्या लग्नानंतर देखील कोणत्याही परपुरुषासोबत सेक्स करण्याची परवानगी असते, या महिलांच्या पतीची अशा कोणत्याही गोष्टीसाठी कोणतीही हरकत नसते.

आज आपण हिंबा जातीमधील महिलांबद्दल बोलणार आहोत. हिंबा जातीमधील महिला या आपल्या आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात. त्यानंतर पुन्हा त्या कधीच अंघोळ करत नाहीत. हिंबा ही एक आफ्रिकेमधल्या नामेबियाच्या काही गावांमध्ये आढळून येणारी जमात आहे. या महिला आपल्या पूर्वजांकडून चालत आलेल्या प्रथांचं पालन करतात. या महिला लग्न झाल्यानंतर फक्त हनिमूनच्या दिवशीच अंघोळ करतात. त्यानंतर पुन्हा त्या कधीही अंघोळ करत नाहीत. तसेच लग्नानंतर देखील या महिलांना आपल्या आवडीच्या पुरुषाबरोबर राहण्याचं तसेच सेक्सचं स्वतंत्र असतं, त्यावर या महिलेचा पती कोणतीही हारकत घेत नाही.

Follow Us